लहानग्यांच्या किलबिलाटात शिशुमेळावा उत्साहात…!

0
352

सावंतवाडी : दि १८ : माती, पाणी, अग्नी, वायू, आकाश या पंचमहाभूतांपासूनच शरीर बनलेले असते. त्यामुळे लहान मुलांना नेहमीच पाणी, मातीचे आकर्षण असते. त्यांना पाण्यात खेळायला आवडते. मातीत लोळायला आवडते. पण आपण हे अनुभव त्यांना देतोय का ? कसे देता येतील त्यांना हे अनुभव? आपलं मूल आनंदात खेळताना बघून कोणाला आनंद होणार नाही? त्यासाठीच शिशुमेळाव्याच सावंतवाडीत आयोजन करण्यात आले होत. हसत खेळत अनुभवातून शिक्षण ही विद्याभारतीची मूळ संकल्पना आहे. प्रत्यक्ष कृती, प्रत्यक्ष प्राण्यांची ओळख, झाडांशी गट्टी, माती- पाण्यात मस्ती , विज्ञानाचे छोटे छोटे प्रयोग या सगळ्याचा अनुभव या शिशुना मेळाव्यात दिला. सावंतवाडी येथे अटल प्रतिष्ठान संचलित शिशुवाटिकेत हा मेळावा संपन्न झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन येथील स्त्रीरोगतज्ञ डॉ.राजेश नवांगुळ यांच्या हस्ते झाले. त्यावेळी अटल प्रतिष्ठानचे अध्यक्ष नकुल पार्सेकर, विद्याभारती सिंधुदुर्गचे अध्यक्ष डॉ. मुरलीधर प्रभुदेसाई, उपाध्यक्ष डॉ. शेखर कार्लेकर उपस्थित होते. कार्यक्रमाची संकल्पना शिशुवाटीकेच्या प्रधानाचार्या श्रीमती विजया रामाणे व विद्याभारती सिंधुदुर्गच्या सदस्या डॉ. रश्मी कार्लेकर यांची होती. त्यांना साहाय्य सावंतवाडी, कुडाळ, वेतोरे, दोडामार्गच्या दीदींनी केले. एकूण नव्वद शिशुनी या मेळाव्यात आनंद लुटला.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.