वाघोटन येथे १५ वर्षीय मुलाचा शॉक लागून मृत्यू

0
3059

देवगड : दि १९ : देवगड तालुक्यातील कसबा वाघोटन येथे वाघोटन खाडीत खेकडे पकडण्यासाठी जाणाऱ्या 15 वर्षीय हर्षद घाडी या मुलाचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना आज रविवारी दुपारी 1:30 ते 2 च्या दरम्यान घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , कसबा वाघोटन येथील हमीद अली बोरकर वय 70 हे आपल्या घरच्या मागील बाजूस चिकन विक्रीचा व्यवसाय करत होते. मौजे वाघोटन येथील हर्षद प्रभाकर घाडी(15)हा नेहमी प्रमाणे वाघोटन खाडी येथे खेकडे पकडण्यासाठी लागणारे कोंबडीच्या आतड्या आणण्यासाठी चिकन सेंटरकडे दुपारी 1:30 च्या दरम्याने गेला होता.बोरकर यांनी कोबड्याची चोरी होत असल्याने कोंबड्याच्या खुरड्याला (लोखंडी जाळीच्या पिंजऱ्याला) विद्युत प्रवाह जोडला होता.हर्षद हा दुपारी आतड्या आणण्यासाठी तेथे गेले असता मात्र त्याचा अचानक तोल गेल्याने हर्षद कोंबड्याच्या लोखंडी पिंजऱ्यावर पडला.हर्षद याला विजेचा तीव्र झटका लागल्याने हर्षदचा जागीच मृत्यू झाला.या घटनेची माहीती मिळताच सरपंच कृष्णा (बाबा) आमलोसकर यांनी घटनास्थळाची पहाणी करत केली या घटनेची माहिती विजयदुर्ग पोलिसांना दिली याघटनेची माहिती मिळताच विजयदुर्ग पोलीस निरीक्षक संतोष कोळी, हवालदार राजन जाधव,सुदेश तांबे, कांबळे, जाधव, किरण कदम, यांनी घटनास्थळी घाव घेत घटनेचा रीतसर पंचनामा करून करून हर्षद याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी देवगड ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. उशिरा पर्यत विजयदुर्ग पोलीस स्टेशनला याघटनेची नोंद करण्याची प्रक्रिया चालू होती.

 

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.