नुतन जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी स्वीकारला पदभार..!

0
1123

सिंधुदुर्गनगरी, दि. २० : जिल्ह्याच्या नुतन जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार आज स्वीकारला. मावळते जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या कडून त्यांनी जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जिल्ह्याला परिचित असलेल्या के.मंजलक्ष्मी यांची केंद्रीय लोक सेवा आयोगाच्या भारतीय प्रशासकीय सेवेतून थेट निवड झाली आहे. यापूर्वी त्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून उत्तम प्रकारे प्रशासन सांभाळले आहे. अधिकारी तसेच कर्मचारी यांच्या सोबत अत्यंत सलोख्याचे नाते निर्माण करून प्रशासनासोबतच लोकांच्या मनातही त्यांनी स्थान निर्माण केले आहे. अशा कर्तबगार अधिकारी म्हणून ओळख असलेल्या श्रीमती के.मंजूलक्ष्मी या आता जिल्हाधिकारी म्हणून जिल्ह्याचे प्रशासन सांभळणार आहेत.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.