बांदा इथं शासकीय बँकांमध्ये स्वतंत्र रांगेतून सेवा मिळण्याची ज्येष्ठ नागरिक संघाची मागणी मान्य 

0
226
बांदा : दि २१ : येथील विविध शासकीय बँकांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना स्वतंत्र रांगेतून सेवा मिळावी, अशी मागणी जेष्ठ नागरिक संघाने केलीय. आज बांदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांनी बांद्यातील बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक, बँक ऑफ महाराष्ट्र आणि सिंधुदुर्ग बँक या बँकांच्या शाखा अधिकाऱ्यांना बोलावले होते. त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी बांदा ज्येष्ठ नागरिक संघाशी या संदर्भात चर्चा केली. त्या अनुषंगाने बांदा पोलीस ठाण्याचे पोलीसनिरीक्षक अनिल जाधव यांच्या उपस्थितीत हि मागणी मान्य करण्यात आली.  दर महिन्याची पेंशन घेण्यासाठी येथील विविध बँकात जात असतात. येथील गर्दीत रांगेत उभं राहण त्यांना वयोमानानुसार अशक्य असते. यासाठी जेष्ठ नागरिक संघाने ज्येष्ठांसाठी वेगळी रांग असावी अशी मागणी केली होती. यावेळी बांदा ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी व बँकांचे पदाधिकारी उपस्थितीत होते.
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.