अ.सिं.जि.प्रा.शिक्षक संघाच्यावतीने घेण्यात आलेल्या सराव परीक्षांना उत्स्फूर्त प्रतिसाद

0
414

वैभववाडी : दि २१ : अखिल सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती सराव परीक्षेत पाचवीत ओम माने तर आठवीत प्रणय बोभाटेने प्रथम क्रमांक पटकाविला.जिल्हा प्राथमीक संघाच्यावतीने पाचवी व आठवी शिष्यवृत्ती सराव परीक्षा तर चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यासाठी डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम प्रज्ञाशोध सराव परीक्षा तालुक्यातील ११ केंद्रावर घेण्यात आली होती.या परीक्षेच्या अनुषंगाने शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्गही संघाच्या माध्यमातुन घेण्यात आले होते.या परीक्षेला तालुक्यातील ५९५ विद्यार्थी बसले होते.३००गुणांची परीक्षा घेण्यात आली होती. पाचवी शिष्यवृत्ती सराव परीक्षा-प्रथम क्रमांक-ओम दिलीप माने,नाधवडे,गुण-२९६,व्दितीय क्रमांक-अथर्व जयवंत मोरे,कोकिसरे,२७०गुण,तृतीय क्रमांक-काव्या दत्तगुरू चव्हाण,सोनाळी,गुण-२५०, आठवी शिष्यवृत्ती सराव परीक्षा-प्रथम क्रमांक-प्रणय प्रकाश बोभाटे,नाधवडे-गुण-२५२,व्दितीय क्रमांक-सिध्देश प्रकाश भरडे,नाधवडे,गुण-२३८,तृतीय क्रमांक-पराग प्रल्हाद कुडतरकर-नाधवडे,गुण-२३४,डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम प्रज्ञाशोध परीक्षा चौथी- प्रथम क्रमांक-आदित्य अनंत साटम,करूळ,गुण-२५०,व्दितीय क्रमांक-पार्थ संदीप कोलते-करूळ,गुण-२४२,तृतीय क्रमांक-पुजा अंबादास चेमटे-कुसुर,गुण-२३८,डॉ.ए.पी.जे.सातवी परीक्षा-प्रथम क्रंमांक-श्रृती संतोष गुरव,नापणे,गुण-१९६,द्वितीय क्रमांक-खुशी गजानन गावनेर-हेत,गुण-१८८,तृतीय क्रमांक-दिपेश जयप्रकाश यादव-नापणे,गुण-१८४ ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शिक्षक संघाचे अध्यक्ष अनंत फोंडके,सचिव दिनकर केळकर,महिला सेल अध्यक्ष श्रीमती श्रृती पालांडे,सचिव लता तांबे यांच्यासह सघंटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.