देवगड फणसगावातील दारूबंदीसाठी एकवटली नारीशक्ती

0
1803

देवगड : दि २१ : देवगड तालुक्यातील फणसगाव मधील महिलांनी गावात दारूबंदीच्या जनजागृती करण्यासाठी सोमवारी सकाळी भव्य रॅली काढण्यात आली. यामध्ये सुमारे १००  महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या रॅलीचे नेतृत्व महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षा वंदना नरसाळे यांनी केले. दारू व्यवसायामुळे अनेक संसार उध्वस्त होत आहेत. त्यामध्ये काहीही दोष नसताना महिलांना त्याची आयुष्यभर शिक्षा भोगावी लागते. अलीकडे तरुण पिढी ही या व्यसनाकडे वळली असून यामुळे समाजाचे आणि गावाचे नुकसान होत असल्याने फणसगावातील महिलांनी एक पाउल पुढे टाकून या विरुध्द बंड पुकारले. याबाबतचे लेखी निवेदन सबंधित अधिकारी यांना देण्यात आले होते.या रॅलीत सरपंच सायली कोकाटे, राजू जठार, उदय पाटील, बंड्या नारकर, मंगेश मणचेकर, दयानंद कदम, वसंत आड़ीवरेकर, महेश पडवळ, जितेंद्र तेली, ग्रामपंचायत सदस्य बाबू आड़ीवरेकर, सिद्धि पाटिल, सरिता आग्रे, सुजाता पेंडुरकर, बिट्या हळदणकर, कृष्णा नर यांच्यासह असंख्य महिला सहभागी झाल्या होत्या. तसेच राज्य उत्पादन शुल्काचे अधिकारी आणि विजयदुर्ग पोलीस स्थानकाचे कोळी यावेळी उपस्थित होते. ग्रामपंचायती कडून या रॅली ची सुरुवात होऊन बौद्धवाडी त्यानंतर कोकाटे वाडी पुढे कुंभार वाडी आणि पुन्हा ग्रामपंचायत कार्यालय अशी रॅली काढण्यात आली.यावेळी दारूबंदी होण्यासाठी जनजागृती व्हावी विविध घोषणा देण्यात आल्या. या रॅलीत महिलांचा मोठ्या संख्येने असलेला सहभाग महत्त्वाचं होता.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.