बिग बॉसच्या घरात झाला मोठा राडा ; हाणामारीपर्यंत गेले प्रकरण

0
567

मुंबई : बिग बॉसच्या घरात सध्या चांगलाच गोंधळ पाहायला मिळतोय. सध्या बिग बॉसने घरातील सदस्यांना एक टास्क दिलेला आहे. चोर पोलिस हा टास्क खेळताना घरातील सदस्यांमध्ये चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली. शुक्रवारचा एपिसोडमध्ये बिग बॉसच्या घरात अभूतपुर्व गोंधळ पाहायला मिळाला. हे प्रकरण आता हाणामारीपर्यंत पोहोचले आहे. बिग बॉसने घरातील सद्यांना चोर-पोलिस हा खेळ खेळण्याच्या टास्क दिला होता. यामध्ये दोन टीम करण्यात आल्या. हा गेम खेळताना दोन्हीही टीममध्ये प्रचंड वाद झाला. यामध्ये मेधा आणि रेशम यांच्यातही जोरदार भांडण झाले. स्मिता आणि उषा नाडकर्णी यांच्यातरी मोठा वाद झाला. या खेळात राजेशची टीम विजयी ठरली.

जुई पुष्करमध्ये कॅप्टन पदासाठी चुरस
चोर-पोलिसचा खेळ संपल्यानंतर बिग बॉसच्या घरात कॅप्टनपदासाठी चुरस रंगली. यामध्ये जुई आणि पुष्कर यांच्या कॅप्टनपदासाठी स्पर्धा रंगली. कॅप्टन पदासाठी दिलेल्या टास्क दरम्याने प्रचंड गदारोळ पाहायला मिळाला. यावेळी सुशांत आणि पुष्कर यांच्यात मोठा वाद झाला. दोघांचे प्रकरण हाणामारीपर्यंत येऊन पोहोचले.

दिला होता हा टास्क
कॅप्टनशीप पदासाठी पुष्कर आणि जुई यांना एक टास्क देण्यात आला. यामध्ये दोघांनाही समान ठोकळे देण्यात आले. हे ठोकळे या दोघांना एका रांगेत उभे करायचे होते. या दोन्हींच्या समर्थकांनी विरुध्द स्पर्धकाचे ठोकळे पाडायचे होते. ज्यांचे सर्वात जास्त ठोकळे उभे असतील तो स्पर्धक विजयी ठरेल. हा टास्क खेळताना प्रचंड गोंधळ झाला. एकमेकांच्या समर्थकांनी ठोकळे पाडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. हे ठोकळे पाडण्यात सईने पुरेपूर प्रयत्न केला. यावेळी फिजिकल व्हायलेन्स पाहायला मिळाला. या गोंधळात उषा नाडकर्णी यांना धक्का लागल्यामुळे त्या खाली कोसळल्या. यासोबतच अनिल थत्ते हेसुध्दा खाली पडले. जुई आणि सई यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. आता या गेममध्ये कोण विजयी ठरेल हे पाहणं महत्त्वाच ठरेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here