विधवा महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम ; सावित्रीबाई फुले प्रतिष्ठानचा पुरोगामी उपक्रम

0
463

कणकवली : दि २५ : कणकवली येथील सावित्रीबाई फुले प्रतिष्ठानच्यावतीने विधवा महिलांसाठी विशेष हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन २६ जानेवारी रोजी करण्यात आले आहे. नेहमी सधवा महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. परंतु अशा सार्वजनिक कार्यक्रमांपासून विधवा महिलांना डावलले जाते. सावित्री फुलेंचे पुरोगामी विचार प्रत्यक्षात आणत कणकवली येथील सावित्रीबाई फुले प्रतिष्ठानने नियमित हळदीकुंकू सोबतच विधवा महिलांसाठी खास हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित करून फुलेंच्या पिरोगामी विचारांची कास धरली आहे. 26 जानेवारी रोजी पोस्टनजीक उचले प्राथमिक शाळा येथे हळदीकुंकू सोबतच मेहंदी स्पर्धेचे आयोजनही करण्यात आले आहे. मेहंदी स्पर्धा खुल्या गटात आयोजित करण्यात आली असून प्रथम क्रमांकास 1 हजार 501, द्वितीय क्रमांकास 1 हजार1 तृतीय क्रमांकास 501 तसेच उत्तेजनार्थ चौथ्या आणि पाचव्या विजेत्यास प्रत्येकी 351 रूपये रोख बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे.यासाठी पूर्वा सावंत, मोबाईल 9420800150 , 9623120710, यान यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.