सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघानं घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट

0
540

सिंधुदुर्ग : दि २८ :  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत ‘सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्यावतीने सिंधुदुर्गातील व्यापारक्षेत्राच्या समस्या व अडचणींच्या निराकरणासाठी म्हणून मांडण्यात आलेल्या’ व्यापा-यांच्या सनदे बाबत चर्चा करण्यासाठी राज्यशासनाच्या सह्याद्री अतिथिगृहात विशेष बैठक संपन्न झाली. खा. विनायक राऊत यांच्या माध्यमातून आयोजित या बैठकीस आ.दीपक केसरकर उपस्थित होते. महासंघाने मांडलेल्या सनदेतील राज्यशासनाशी निगडीत मुद्द्यांवर निर्णय घेण्यासाठी लवकरच संबंधीत खात्यांच्या अधिका-यांच्या उपस्थित बैठक लावण्याच्या स्पष्ट सुचना यावेळी मुख्यंत्र्यांनी दिल्या. यावेळी महासंघाचे अध्यक्ष नितीन तायशेटे, उपाध्यक्ष संजय सावंत, तालुकाध्यक्ष सावंतवाडी जगदिश मांजरेकर, वेंगुर्ले विवेक खानोलकर, वैभववाडी मनोज(बंडू) सावंत, सदस्य तेजस आंबेकर, अविनाश साळूंखे, सुरेंद्र नारकर, संदेश परब, राष्ट्रवादी व्यापार उद्योग सेल जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी, व्यापारी पतसंस्था अध्यक्ष नितीन वाळके-युवा व्यापारी संघ अध्यक्ष मंदार ओरसकर आदी उपस्थित होते.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.