पत्रकार निलेश जोशी यांना पितृशोक

0
706

कुडाळ : निवृत्त तहसीलदार अशोक दामोदर जोशी वय ७८, रा. अभिनवनगर – कुडाळ यांचे शुक्रवारी रात्री निधन झाले. यांचे मूळ गाव गोठणे तालुका राजापूर हे आहे. पत्रकार निलेश जोशी यांचे ते वडील. अशोक जोशी हे गेल्या ३९ वर्षापासून कुडाळ येथे वास्तव्यास होते. कुडाळ येथे तहसीलदार या पदावर ते कार्यरत होते. ११९४ साली त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. रत्नागिरी, सिंधुदुर्गसह तलासरी (ठाणे), उल्हासनगर (ठाणे) येथे शासकीय नोकरी केली. तर मालवण नगरपालिकेमध्ये काही वर्षे मुख्याधिकारी म्हणून कार्य बजावले होते. सेवानिवृत्तीनंतर ज्येष्ठ नागरिक पतसंस्थेच्या संचालक मंडळावरही त्यांनी काम पाहिले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. 

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.