श्वेताज योगा ग्रुप कणकवलीच्यावतीने सूर्यनमस्कार दिन साजरा

0
756

कणकवली : दि ०२ : सूर्यनमस्कार दिनाचे औचित्य साधुन श्वेताज योगा ग्रुप मधील महिलांनी वृंदावन हॉल कणकवली येथे १००० सूर्यनमस्कार सामुहिकरीत्या घालुन सूर्यनमस्कार दिन साजरा केला.सूर्यनमस्कार हा सर्वांगसुंदर व्यायाम प्रकार आहे.सूर्यनमस्कार हा व्यायाम आपले आरोग्य निरोगी ठेवतो. जगात सर्वत्र हा व्यायाम प्राधान्याने केला जातो. सूर्य जगाचा ऊर्जास्त्रोत आहे. त्यामुळे प्राचीन भारतीय संस्कृतीत दैनंदिन सूर्यनमस्काराच्या माध्यमातून व्यायाम व उपासना यांचा सुरेख संगम साधला आहे व निरामय शतायुषी आयुष्याची सोपी गुरूकिल्ली आपल्याला दिली आहे असे श्वेताज योगा ग्रुपच्या अध्यक्षा योगशिक्षिका सौ.श्वेता गावडे यांनी सांगितले.सर्वांना तेज, ऊर्जा आणि आरोग्य लाभो यासाठी सर्वांनी आपल्या कुटुंबीय व मित्रमंडळींसमवेत सकाळी लवकर उठुन सूर्यनमस्कार घालावेत असे आवाहन श्वेताज योगा ग्रुपच्या अध्यक्षा सौ.श्वेता गावडे यांनी केले आहे.यासाठीच हा सूर्यनमस्कार दिन साजरा केल्याचे श्वेताज योगा ग्रुपच्या अध्यक्षा सौ.श्वेता गावडे यांनी सांगितले. यावेळी श्वेताज योगा ग्रुपमधील सर्व महिला उपस्थित होत्या.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.