चटकदार मिसळचा झटका, वैभववाडीत मिळणार अफलातून ठसका  

0
572
वैभववाडी : चटकदार मिसळचा झटका, आता वैभववाडीत मिळणार अफलातून ठसका // कारण, वैभववाडीत इथं होतोय कोकणातला पहिला अस्सल ठसकेबाज मिसळ महोत्सव // जिथ आपल्याला आस्वाद घेता येणार तब्बल ५० प्रकारच्या चवींच्या अफलातून मिसळचा // कोल्हापुरच्या मिसळचा झटका, पुणेरी मिसळचा ठसका // ८ ते ९ फेब्रुवारीला वैभववाडीत इथंं होतोय मिसळ महोत्सव २०२०, स्वाद महाराष्ट्राचा // वैभववाडी इथल्या दत्त मंदिरजवळ, दुर्गामाता उत्सव पटांगणावर खवय्यांना चाखता येणार एकाच छताखाली ५० चवींच्या मिसळी // आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून साकार होतोय पहिला आगळावेगळा मिसळ महोत्सव // महोत्सवाची सुरू आहे जय्यत तयारी // राज्यातील नामवंत मिसळ व्यावसायिक महोत्सवात होणार सहभागी // ८ फेब्रुवारीला सकाळी ११ वा महोत्सवाचा होणार प्रारंभ // माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे व माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थित महोत्सवाचे होणार उद्घाटन // सायंकाळी ६.३० ते ७.४५ या वेळेत होणार सांस्कृतिक कार्यक्रम // ९ फेब्रुवारीला सकाळी ९ वाजता मिसळ स्टाँल होणार खवय्यांसाठी खुले // सकाळी ११ वाजता महीलांसाठी होणार विशेष खेळ // सायंकाळी ५ वाजता होणार सांस्कृतिक कार्यक्रम // सांगता सोहळ्याला स्टार प्रवाह मराठी वाहीनीच्या कलाकारांचा होणार विशेष कार्यक्रम // मान्यवरांच्या हस्ते कलाकार आणि मिसळ स्टाँलधारकांच्या सत्काराने महोत्सवाची होणार सांगता // मिसळ महोत्सव वैभववाडीकरांसाठी ठरणार एक नवीन पर्वणी //
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.