प्रतिक्षा तावडे यांना शिक्षणरत्न पुरस्कार प्रदान ; सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते झाले पुरस्कार वितरण

0
992

कणकवली : दि ०८ : सह्याद्री उद्योग समूह अहमदनगर या संस्थेमार्फत दिला जाणारा राज्यस्तरीय शिक्षणरत्न पुरस्कार जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा माईण नं १ च्या उपक्रमशिल पदवीधर शिक्षिका सौ. प्रतिक्षा प्रसाद तावडे यांना ज्येष्ठ समाजसेविका तथा गरिबांची माय डाँ. सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते महाबळेश्वर पाचगणी येथे सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला सह्याद्री उद्योग समूहाचे अध्यक्ष श्री. संदीप थोरात, शुभांगी थोरात, अमोल बागुल आदी उपस्थित होते. शिक्षकांनी शाळास्तर, सामाजिक स्तर व राष्ट्रस्तर विकासासाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन उपक्रमशिल प्रतिभावंत शिक्षकांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असे अध्यक्ष थोरात यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले. या पुरस्काराबद्दल प्रतिक्षा तावडे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. तसेच त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत. यापूर्वी त्यांना पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक उपाध्यक्षा तथा राष्ट्रवादी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या पक्षनिरीक्षक अर्चना घारे परब यांच्या हस्ते नेमळे शिक्षणसंस्थेचा जिल्हास्तरीय व माजी मुख्यमंत्री मा. शरद पवार यांच्या हस्ते व शिक्षणमंत्री मा. विनोद तावडे यांच्या उपस्थितीत डाँ . कुमुद बन्सल राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाला आहे.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.