आंगणेवाडीच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : पालकमंत्री उदय सामंत

0
503

मालवण : दि १० : आंगणेवाडी गावच्या विकासासाठी १३ कोटींचा स्वतंत्र आराखडा बनवला जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून आंगणेवाडीच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही, आंगणेवाडीसाठी मंजूर झालेला निधी आंगणेवाडीतच खर्च केला जाईल. जिल्हा नियोजन मधूनही निधी उपलब्ध करून देऊ. अशी ग्वाही पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. आंगणेवाडी यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री उदय सामंत यांनी आंगणेवाडी येथील नियोजनाचा आढावा घेत आंगणे ग्रामस्थांनी सुचवलेली कामे तात्काळ पूर्ण करण्याचे आदेश प्रशासनास दिले. भाविकांची दर्शन व्यवस्था व प्रशासकीय सुविधांचा आढावाही घेण्यात आला.आंगणेवाडी गावात दरवर्षी यात्रेच्या निमित्ताने लाखोंच्या संख्येने भाविक उपस्थिती दर्शवितात. त्यांना सेवा सुविधा देण्याच्या दृष्टीने व आंगणेवाडी गावच्या विकासासाठी १३ कोटींचा स्वतंत्र आराखडा बनवला जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून आंगणेवाडीच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही, आंगणेवाडीसाठी मंजूर झालेला निधी आंगणेवाडीतच खर्च केला जाईल. जिल्हा नियोजन मधूनही निधी उपलब्ध करून देऊ. अशी ग्वाही पालकमंत्री उदय सामंत यांनी मंडळाचे अध्यक्ष भास्कर आंगणे यांना दिली.आंगणेवाडी यात्रेच्या पार्श्वभूमीवर राज्याचे राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सोमवारी (१०) आंगणेवाडी येथे भराडी देवीचे दर्शन घेत ग्रामस्थ मंडळ आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी यात्रेच्या अनुषंगाने गावच्या विकासात्मक कामांचा आढावा त्यानी घेतला. यावेळी गावच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळणार असल्याचे सांगून १७ फेब्रुवारी पूर्वी यासंबंधीचा आराखडा बनवण्याची सूचना त्यांनी केली. मालवण – आंगणेवाडी रस्ता पूर्णतः खराब झाला आहे. याबाबत ग्रामस्थांनी माहिती दिली असता या रस्त्याची टेंडर प्रक्रिया झाली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यावर तातडीने रस्त्यावरील खड्डे बुजवा आणि खड्डे बुजवल्याची माहिती १४ फेब्रुवारीच्या जिल्हा दौऱ्यात मला मिळालीच पाहिजे, अशा सक्त सूचना प्रशासनास दिल्या.यावेळी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष भास्कर आंगणे, बाबू आंगणे, दीपक आंगणे व अन्य ग्रामस्थांनी यात्रेच्या नियोजना संदर्भात प्रशासनाला सूचना केल्या. यावेळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत वसेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, प्रांताधिकारी वंदना खरमाळे, तहसीलदार अजय पाटणे, पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यासह शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, संदेश पारकर, अतुल रावराणे, माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, नगरसेवक यतीन खोत, गणेश कुडाळकर, हर्षद गावडे, बिळवस सरपंच सौ. रुपाली नाईक, पंकज वर्दम, अमित भोगले व ग्रामस्थ उपस्थित होते.हेलिपॅडची पाहणी करत मुख्यमंत्री व अन्य मंत्री यांची हेलिकॉप्टर उतरण्याच्या ठिकाणांची व मार्ग व्यवस्थेची पाहणी करत सुरक्षेचा आढावा घेण्यात आला. मंडळाला, ग्रामस्थांना शिवसैनिक व पदाधिकारी सहकार्य करतील असेही मंत्री सामंत यांनी सांगितले.यावेळी यात्रोत्सवात जिल्हापरिषद सिंधुदुर्ग यांच्या वतीने प्लास्टिक मुक्तीचा संदेश देण्यात आल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी दिली.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.