मिठबाव व्यापारी मित्र मंडळाचा वर्धापनदिन…!

0
513

देवगड : दि. १३ :  मिठबाव येथील व्यापारी मित्र मंडळाच्या वर्धापन दिन पाचवा वर्धापन दिन सोमवारी साजरा करण्यात आला या वर्धापन दिनानिमित्त व्यापारी मित्र मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये स्थानिक भजने, महिलांचे विविध कार्यक्रम,मिठबाव पंचक्रोशीतील स्थानिक मुलांचे कार्यक्रम, पावणाई ग्रुप किंजवडेचा फुगडी कार्यक्रम याबरोबरच लहान व मोठ्या अश्या दोन गटात जिल्हास्तरीय रेकॉर्ड स्पर्धेचे करण्यात आले.यामध्ये मोठ्या गटातून सिमरन नायर ईशा गोडेकर तर लहान गटातून नंदीने बीले ऋतुराज चव्हाण यांनी प्रथम क्रमांक मिळविले. मोठ्या गटात नेहा जाधव व सानिका चव्हाण द्वितीय,मृणाल सावंत तृतीय तर उत्तेजनार्थ विद्या माजकाचे,लहान गटातून अनुष्का कांदळगावकर व दिव्या लुडबे द्वितीय, सानिका सावंत व दिव्या धामणेकर तृतीय, तर समर्थ गवंडी,आर्या मिठबावकर,सोहम जांभोरे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.या स्पर्धेत सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण ४० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेतील सर्वच स्पर्धकांनी बहारदार पध्दतीने केलेल्या सादरीकरणामुळे प्रथम तीन क्रमांक विभागून देण्यात आले.स्पर्धेचे परीक्षक म्हणून सौ तन्वी चांदोस्कर व योगेश पाटणकर यांनी काम पाहिले.यावेळी शिक्षण व आरोग्य सभापती सौ सावी लोके,देवगड पंचायत समिती सभापती सुनील पारकर, रामेश्वर प्रतिष्ठान अध्यक्ष भाई नरे,परशुराम लोके,शिवशंकर लोके, माजी सभापती डॉ मनोज सारंग,पोलिस पाटील जयवंत मिठबाबकर, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष शाम कदम,समीर सोमण,मिठबाव व्यापारी मित्रमंडळ अध्यक्ष प्रकाश कदम, सचिव विनोद लोके , दिनेश फाटक, बाळू जेठे, राजेंद्रप्रसाद नाडकर्णी तसेच सर्व व्यापारी बंधू आदी उपस्थित होते.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.