आंगणेवाडी जत्रोत्सवाच्या निमित्त जिल्हास्तरीय कृषी व औद्योगिक प्रदर्शनाचं आयोजन  

0
391

मालवण : दि १४ : सोमवार दिनांक १७ फेब्रुवारी व मंगळवार दिनांक १८ फेब्रुवारी रोजी श्री भराडी देवी आंगणेवाडी जात्रोत्सवाच्या निमित्ताने आंगणेवाडी मालवण येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्यामार्फत जिल्हास्तरीय कृषी व औद्योगिक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहेत. या प्रदर्शनाची जय्यत तयारी चालू असून विभागिय कृषी सदसंचालक कोकणविभाग ठाणेचे विकास पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. सी. जी.बागल यांच्या मार्गदर्शनाखाली कामकाज चालू आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन महराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते करण्यात येणार आहे. तर विविध खात्याचे मंत्री, वरिष्ठ अधिकारी, पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत व जिल्ह्यातील सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत. या प्रदर्शनामध्ये विविध प्रकारचे स्टॉल मांडण्यात येणार असून याचा सर्व शेतकऱ्याना निश्चित फायदा होईल असे मत जिल्हा अधीक्षक डॉ. सी.जी. बागल यांनी व्यक्त केले आहे. तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here