सिंधुदुर्ग जिल्हा मिडिया पत्रकार महासंघाची जिल्हा कार्यकारणी जाहीर

0
356

सिंधुदुर्ग : दि १४ :  सिंधुदुर्ग जिल्हा मिडिया पत्रकार महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी पत्रकार आबा खवणेकर, सचिवपदी कृष्णा सावंत तर उपाध्यक्षपदी समिल जळवी,शिरिष नाईक यांची निवड करण्यात आली. तर खजिनदारपदी विष्णू धावडे व सह सचिवपदी भूषण सावंत यांची निवड करण्यात आली. पत्रकारांवरील अन्याय, पत्रकारांना येणाऱ्या धमक्या तसेच पत्रकारांच्या लहान मोठ्या समस्या यासाठी एकाकी झुंज देण्यापेक्षा संघटित होत तसेच संघटनेपासुन दुर राहुन कार्यरत असलेल्या मिडिया पत्रकारांना समाविष्ट करीत अस्तित्वात आलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा मीडिया पत्रकार महासंघाच्या जिल्हा कार्यकारिणी निवड नुकतीच जाहीर करण्यात आली. कुडाळ तालुक्यातील माणगाव येथिल टेंबेस्वामी मंदिरात पार पडलेल्या मिडीया पत्रकारांच्या बैठकीत या महासंघाच्या अध्यक्षपदी कोकणचा तडाखा या सोशल मिडिया समुहाचे प्रमुख, केळुस गावचे उपसरपंच तथा निर्भिड पत्रकार आबा खवणेकर यांची तर उपाध्यक्षपदी लोकसंवाद लाईव्ह चँनलचे संपादक समिल जळवी,शिरीष नाईक संपादक दोडामार्ग अपडेट न्यूज चॅनल तर सचिन पदी कृष्णा सावंत संपादक महाराष्ट्र लाईव्ह न्यूज चॅनल, तर खजिनदार पदी विष्णू धावडे समर्थ न्यूज चॅनल देवगड तर सह सचिवपदी भुषण सावंत संपादक सिंधुदुर्ग न्यूज चॅनल यांची एकमताने निवड करण्यात आली.यावेळी युवा महाराष्ट्रच्या रुपाली देसाई, ऍड.सिद्धीका भांडीये, महाराष्ट्र लाईव्हच्या ,स्नेहा मोर्ये,लोकसंवाद लाईव्ह,संतोष तांबे, लोकसंवाद लाईव्ह,अजय गडेकर लोकसंवाद लाईव्ह,निकेत शुंगारे लोकसंवाद लाईव्ह प्रतिनिधी,अमिता मठकर प्रतिनिधी,प्रमोद गवस-संपादक DNS न्यूज चॅनल, तुळशीदास नाईक Z.24 तास न्यूज चॅनल,सुमित दळवी महाराष्ट्र लाईव्ह प्रतिनिधी,लवू परब-महाराष्ट्र वार्ता,गोविंद शिरसाट-सिंधुदुर्ग माझा प्रतिनिधी,गुरुनाथ राऊळ,कोकण लाईव्ह प्रतिनिधी,आनंद कांडरकर-कोकण संवाद प्रतिनिधी आदी मिडिया पत्रकार उपस्थित होते. हि निवड महाराष्ट्र मिडिया पत्रकार महासंघाच्या सुचनेवरुन जाहिर करण्यात आली असून लवकरच या महासंघाचे राज्यस्तरीय पदाधिकारी कोकण दौ~यावर येऊन पत्रकारांशी संवाद साधून मार्गदर्शन करणार आहेत.या जिल्हा कार्यकारिणी निवडीनंतर जिल्ह्यातील आठही तालुक्यात तालुका कार्यकारिणी निवड होणार आहे.सध्याच्या परिस्थितीत देशातील विदेशातील तसेच राज्यातील सर्व बातम्यांचा आढावा सोशल मिडिया,युट्युब,फेसबुक,वेबपेज,चँनल,व्हाॅटसअॅप गृप तसेच चँनल माध्यमातून काही मिनिटांतच समाजासमोर आणण्याचे काम मिडीया पत्रकार करीत असतात यावेळी घडलेली बातम्यांची वस्तुस्थिती लगेचच जनतेसमोर आणल्यामुळे अशा पत्रकारांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते यासाठी पर्याय म्हणून या क्षेत्रातील पत्रकारांनी अन्यायाविरुद्ध लढा आणि पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा मिडिया पत्रकार महासंघाची स्थापना केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here