श्री गजानन महाराज मंदिरात उद्या प्रकट दिन सोहळा

0
146

सावंतवाडी : दि १४ : मळेवाड येथील श्री गजानन महाराज मंदिरात उद्या महाराजांचा प्रकट दिन सोहळा साजरा करण्यात येणार आहे.यानिमित्त सकाळी श्रींची पाद्यपूजा,पंचामृत अभिषेक, महापूजा,दुपारी 12:30 वाजता महाआरती व 1 वाजता दुपारी उपस्थित भक्तांना महाप्रसादाचे आयोजन केले आहे.यानंतर दुपारी 2:30 वाजता श्री स्वामी समर्थ मंडळ,शिवोली गोवा यांचा आरतीचा कार्यक्रम,4 वाजता संदेश सामंत यांचा भक्ती गीतांचा कार्यक्रम,7 वाजता पालखी सोहळा व महाआरती व रात्रौ 10 वाजता श्री मुसळेश्वर नाट्य मंडळाचा कौटुंबिक नाट्य प्रयोग उंबरठ्यावरी माप ठेविले सम्पन्न होणार आहे.तरी वरील सर्व कार्यक्रमाचा सर्वानी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here