ज्ञानदीप मंडळातर्फे जिल्हास्तरीय स्पर्धांच आयोजन ; विविध गटात होणार काव्यलेखन, निबंध व चित्रकला स्पर्धा

0
516
सावंतवाडी : दि १५ : सावंतवाडी येथील ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळातर्फे याहि वर्षी जिल्हास्तरीय विविध स्पर्धांच आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये स्वरचित काव्यलेखन, निबंध व चित्रकला स्पर्धा विविध गटात घेण्यात येणार आहेत.  यामध्ये इ. चौथी ते पाचवी या गटातील विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा होणार आहे. यामध्ये १ ) मी पक्षांना दाणे घालताना, २ ) स्वराज्याची शपथ घेताना बालशिवाराय, ३ ) मी पाहिलेलं हिरवगार शेतीच दृश्य हे विषय असणार आहेत. तर निबंध स्पर्धा सहावी ते आठवी या गटातील विद्यार्थ्यांसाठी  होणार आहे. यामध्ये १ ) वृक्ष लागवड काळाची गरज, २ ) संगणक आणि मानवी विकास, ३ ) जीवनातील खेळाचे महत्व हे विषय असणार आहेत. तर नववी ते बारावी या गटातील विद्यार्थ्यांसाठी १ ) शेती विकासासाठी काय करता येईल ?, २ ) आजच्या युवापिढीचे सामाज बांधणीसाठी योगदान, ३ ) ग्रंथ संवर्धनासाठी उपाययोजना हे निबंध स्पर्धेसाठीचे नियम असून निबंध हा कमीत कमी ४० ओळींचा असावा. तर स्वरचित काव्यलेखन स्पर्धा हि खुल्या गटात होणार आहे, कविता हि सामाजिक आशय चिंतनशील विषयावर असावी. स्पर्धकांनी निबंध, चित्र व कविता लेखन केलेल्या कागदावर स्वत:च पूर्ण नाव, पत्ता, शाळेच नाव व फोन नंबर लिहावा. स्पर्धकांनी आपल्या कविता, चित्र व निबंध सौ. प्रज्ञा मातोंडकर (मळगाव, हाय. सा.वाडी), प्रतिभा चव्हाण (डी.एड.कॉलेज आजगाव), संप्रवी कशाळीकर (दोडामार्ग हाय.), निलेश पारकर (एस.एम.हाय.कणकवली), आर.व्ही.नारकर (मुख्यध्यापक कासार्डे हाय.), प्रा. नागेश कदम (टोपीवाला डी.एड.कॉलेज मालवण), सलीम तकीलदार (साळगाव हाय.कुडाळ), विठ्ठल कदम (मुख्याध्यापक कुणकेरी प्राथमिक शाळा) यांच्याकडे जमा करावीत. या स्पर्धांंमध्ये पहिल्या तीन विजेत्यांना पारितोषक देऊन गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धा एस. आर.मांगले, रेश्मा भाईडकर, प्रा. अशोक कुलकर्णी यांनी पुरस्कृत केल्या आहेत. या तिन्ही जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा व आपले  निबंध, चित्र व कविता १० मार्च २०२० पर्यंत पाठवावे अस आवाहन संस्थापक अध्यक्ष  वाय.पी.नाईक, अध्यक्ष  जावेद शेख, सहसचिव विनायक गांवस, प्रा. रुपेश पाटील, मनोहर परब यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी या ९४२०२०४१०५ नंबरवर संपर्क साधावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here