सचिनच्या भविष्याला आमदार नितेश राणे यांनी दिलं पायांचं बळ !

0
1237

सिंधुदुर्ग : दि १८ : दिड वर्षांपूर्वी अपघातात दोन्ही पाय निकामी झालेला कणकवली तालुक्यातील बावशी येथील सचिन सावंत हा युवक ८ फेब्रुवारी २०२० रोजी आमदार नितेश राणे यांना कणकवली निवासस्थानी येऊन भेटला होता. मानसिकदृष्ट्या खचलेला आणि रिक्षातून पण उतरू शकत नसलेल्या सचिन सावंत यांची त्यावेळी आमदार नितेश राणे यांनी रिक्षाजवळ जाऊन आस्थेने विचारपूस केली होती. दोन्ही पाय गमावल्याने अपंगत्व आलेल्या सचिन सावंत या तरुणाच्या आयुष्यात नवी उमेद निर्माण करण्याच काम आमदार नितेश राणेंनी केलय. नितेश राणे यांनी मदतीचा हात देत महिनाभरात सचिनच्या दोन्ही पायांवर नवे कृत्रिम पाय लावण्यात आले. त्यामुळे सचिन आता आधाराविना सर्वसामान्यांसारखे चालू लागेल.सचिनला मुंबईत बोलावून दोन्ही पायांवर उपाययोजना करून दोन्ही पायांवर उभे करण्याचे आश्वासन आमदार नितेश राणे यांनी दिले होते. त्यानुसार अलीकडेच सचिन सावंत यांना मुंबईत बोलावून प्रसिद्ध अशा नानावटी रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात आला आणि पुढील उपचार सुरु झाले. सचिन याचा एक पाय अर्धा तुटलेला असून दुसऱ्या पायाच्या तळव्याला गंभीर मार लागलेला आहे. दोन्ही पाय निकामी असल्याने सचिन स्वतःच्या पायावर चालू शकत नाही. सचिन याला त्याच्या पायावर उभे करायचे असेल तर कृत्रिम पाय बसवण्याशिवाय पर्याय नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानुसार सचिन याला दोन्ही कृत्रिम पाय बसवण्यासाठी जर्मनीतील प्रसिद्ध अशा ओटोबॉक (Otto Bock) हेल्थकेअर कंपनीशी संपर्क करण्यात आला. ओटोबोक (Otto Bock) च्या मुंबईतील सेंटरमध्ये सचिन सावंत यांच्या दोन्ही पायांचे माप घेण्यात आले असून दोन्ही कृत्रिम पायांची ऑर्डर जर्मनीच्या कंपनीला देण्यात आली आहे. एक महिन्याच्या कालावधीत कृत्रिम पाय जर्मनीवरून आल्यानंतर ते सचिन सावंत यांना बसवण्यात येतील. यानंतर सचिन सावंत आपल्या पायावर चालू शकणार आहे. स्वाभिमान मेडिकल विभागाचे जाहिद खान यांनी सर्व प्रक्रिया पूर्ण करून यासाठी विशेष सहकार्य केले. अत्यंत खर्चिक असलेले हे कृत्रिम पाय बसवण्याचे तसेच इतर खर्च आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून होत असून यामुळे सचिन सावंत याला जगण्याची नवी उमेद दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here