युवासेनेकडून तेरवणमेढेत सरबत वाटप

0
485

दोडामार्ग: दि २१ : शुक्रवारी महाशिवरात्र निमित्त तेरवण मेढेत तालुका युवा सेनेकडुन मोफत कोकम सरबतचे वाटप करण्यात आले. सभापती संजना कोरगावकर यांच्या हस्ते सरबत वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. जवळपास ४००० भाविकांनी यात्रोत्सवात सरबत वाटपाचा लाभ घेतल्याची माहिती युवासेना पदाधिकाऱ्यांकडुन देण्यात आली. यात्रोत्सव निमित्त नागनाथ तीर्थक्षेत्र स्थळी आलेल्या खासदार विनायक राऊत, जिल्हाप्रमुख संजय पडते आदींनी या युवसेनेच्या उपक्रमाचे भेट देऊन कौतुक केले. जिल्हाप्रमुख त्यांच्यासमवेत जि.प गटनेते नागेंद्र परब, तालुकाप्रमुख बाबुराव धुरी, उपतालुकाप्रमुख दौलत राणे, उपजिल्हा प्रमुख गणेशप्रसाद गवस, उपजिल्हा संघटक गोपाळ गवस, युवासेना तालुका प्रमुख भिवा गवस, तालुका समन्वयक मदन राणे, युवासेना उपतालुका प्रमुख भगवान गवस, दत्ताराम देसाई, विकी धर्णे, शाम खडपकर, तन्मय नाईक, सिद्धेश कासार, भरत गवस, तालुका संघटक संजय गवस, सभापती संजना कोरगावकर, महीला आघाडी तालुका प्रमुख श्रेयाली गवस,महीला पदाधिकारी दिपाली दळवी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here