देवगड – चांदोशी येथील आंबा बागेस आग

0
503
देवगड : देवगड तालुक्यातील रस्त्यांजवळ असणाऱ्या आंबा बागेत शॉर्ट सर्किट होऊन दिवसेंदिवस  बागा जळण्याचे प्रमाण वाढत आहे. सोमवारी चांदोशी सडा येथील श्री यशवंत कोले गुरुजी यांच्या बागेच शॉर्ट सर्किट मुळे लागलेल्या आगीत आंबा काजूची वीस पंचवीस झाडे होरपळून गेली आहेत. येन आंबा काढणीच्या हंगामात आगीच्या भक्षस्थानी गेल्यामुळे फार मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. देवगड तालुक्यातील आंब्याच्या बागा आगीत जळण्याचे प्रकार सर्वत्र घडत असल्यामुळे आंबा बागायतदार त्रस्त झाले आहेत. अनेक प्रकारच्या रोगांवर महागडी औषधें फवारून फळांचे रक्षण केले जाते. माकडांच्या त्रासाला सामोरे जाताजाता आगीच्या भक्षस्थानी बागा जाऊ लागल्याने बागायतदार  आपले जीवन कसे जगवायचे या विचारत आहेत. सोमवारी कोल्हे यांच्या बागेत शॉर्ट सर्किटने आग लागली.  चांदोशी येथील चिरेखाणीवरील कामगारांनी मेहनत घेऊ अर्ध्याहुन अधिक बाग आगीपासून वाचविली. आगीत जळून होणाऱ्या बागेचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना व्हाव्यात अशी मागणी आंबा बागायतदार कोल्हे गुरुजी यांनी केलीय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here