एलईडी, बुलट्रॉलिंग मासेमारीला बंदीचा निर्णय भाजपामुळेच – अतुल काळसेकर

0
1028

मालवण :  राज्याच्या सागरी हद्दीत सुरू असलेल्या प्रकाश झोतातील मासेमारी विरोधात पारंपरिक मच्छीमारांनी पुकारलेल्या लढ्याला अखेर यश आले आहे. राज्याच्या सागरी हद्दीत प्रकाश झोतातील मासेमारीसह बुलट्रॉलिंग, पेअर पद्धतीच्या मासेमारीस बंदी घालण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यामुळे पुढील मासेमारी हंगामात चांगले चित्र पहावयास मिळेल. पारंपरिक मच्छीमारांच्या लढ्याला बळ देणारा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्याने जिल्हा भाजपच्यावतीने त्यांचे आभार मानत आहोत. असे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत सांगितले. तालुका भाजप कार्यालयात पत्रकार परिषद झाली. यावेळी तालुकाध्यक्ष विजय केनवडेकर, भाजप मच्छीमार सेलचे अध्यक्ष रविकिरण तोरसकर, गणेश कुशे, आप्पा लुडबे आदी पदाधिकारी उपस्थित होते. श्री. काळसेकर म्हणाले, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रकाश झोतातील मासेमारीमुळे संघर्ष पेटला होता. यासंदर्भात गेले तीन महिने मच्छीमार सेलचे तोरसकर, तालुकाध्यक्ष केनवडेकर यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. या प्रश्‍नी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. त्याचबरोबर सागरी मासेमारी नियमन कायद्यात बदल होण्यासाठी कोकण किनारपट्टीवरील पाचही जिल्ह्यांच्या जिल्हा मच्छीमार सल्लागार समित्यांनी घेतलेल्या ठरावामुळे शासनाने या मासेमारीला बंदी घालण्याची अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेमुळे प्रशासनास कारवाई करताना भेडसावणार्‍या समस्या दूर झाल्या आहेत. शासनाने या मासेमारीला बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याने हा पारंपरिक मच्छीमारांच्या लढ्याचा मोठा विजय आहे. या निर्णयामुळे पुढील मासेमारी हंगामात वेगळे चित्र आपल्याला दिसून येईल. पारंपरिक मच्छीमारांचा लढा आता अंतिम टप्प्यात आला आहे. प्रकाश झोतातील मासेमारीबरोबरच परप्रांतीय ट्रॉलर्सची घुसखोरी हा प्रश्‍न भेडसावत असल्याने या विरोधात जिल्ह्यातील सर्व मच्छीमार नेत्यांनी, राजकीय संघटनांनी एकत्रित येत लढा उभारण्याची गरज निर्माण झाली आहे. परप्रांतीय ट्रॉलर्सची घुसखोरी रोखण्यासाठी स्वतंत्र अंमलबजावणी कक्षाची आवश्यकता आहे त्यादृष्टीने येत्या काळात प्रयत्न केले जाणार आहेत.  मत्स्य विद्यापीठ नागपूरला हलविण्याच्या हालचाली संदर्भात श्री. काळसेकर यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, मत्स्य विद्यापीठाच्या प्रश्‍नासंदर्भात मच्छीमार सेलचे अध्यक्ष र

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.