शिवसेना महिला आघाडी वेंगुर्ला तर्फे महिलादिनाच्या पूर्वसंध्येला विविध कार्यक्रम

0
504

वेंगुर्ला : दि ०३ : वेंगुर्ला तालुका शिवसेना महिला आघाडी यांच्यावतीने महिलादिनाचे औचित्य साधून महिला दिनाच्या पूर्वसंध्येला ७ मार्च रोजी महिलांसाठी महाआरोग्य शिबिर व शिवसेना महिला पदाधिकारी, महिला शिवसैनिक यांच्यासाठी “एक उनाड दिवस” या स्नेहमेळाव्या सहित विविध सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी आयोजित करण्यात आली आहे.
७ मार्च रोजी सकाळी ९ ते दुपारी २ पर्यंत शिवसेना विधानसभा संपर्कप्रमुख शैलेश परब व मुंबईच्या माजी नगरसेविका शिवानी परब यांच्यामार्फत महिलांसाठी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिरात वालावलकर हॉस्पिटल डेरवण व जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग यांचे तज्ञ डॉक्टर महिलांचा जनरल चेकअप, ऍनिमिया (HB), शुगर, ब्लडप्रेशर तपासणी, स्त्रियांच्या आरोग्य विषयक विविध समस्या तसेच गर्भाशय मुखाचा व स्तन कॅन्सर तपासणी करणार आहेत. यानंतर दुपारी ३ ते सायं ७ पर्यंत शिवसेना महिला आघाडी पदाधिकारी व शिवसैनिक महिला यांचा स्नेहमेळावा म्हणजेच “एक उनाड दिवस” हा कार्यक्रम ठेवण्यात आला असून यात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, खेळ व मनोरंजनाची भरगच्च मेजवानी ठेवण्यात आली असल्याची माहिती वेंगुर्ला तालुका शिवसेना महिला आघाडी ओदाधिकाऱ्यांच्या वतीने देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी वेंगुर्ला तालुका महिला संघटक सुकन्या नरसुले (9823831953), नगरसेविका सुमन निकम (9421146626)व महिला शहर संघटक मंजुषा आरोलकर (9420742248) यांच्याशी संपर्क साधावा.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.