कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषद क्षेत्रात मीटिंग, यात्रा, समारंभ न घेण्याचे मुख्याधिकाऱ्यांंना आदेश

0
594

कुडाळ : दि. ०६ : कोरोना व्हायरस प्रतिबंधक उपाय म्हणून मुख्य सचिव यांनी व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये दिलेल्या आदेशानुसार नगरपरिषद क्षेत्रात मीटिंग, यात्रा, समारंभ न घेण्याचे मुख्य सचिव यांनी आदेश दिले आहेत. आपल्या क्षेत्रात असलेल्या मीटिंग, यात्रा, समारंभ, यासारखे जनसमुदाय एकत्रित आणणारे कार्यक्रम होवू देऊ नये याची खबरदारी मुख्याधिकारी यांनी घ्यावी. लोकांमध्ये जनजागृती करण्यात यावी. काय करावे व काय करू नये यासंबंधी सार्वजनिक ठिकाणांवर फलक, होर्डिंग्ज लावण्यात यावे. प्रतिबंधक उपाययोजनांची प्रसार माध्यमांद्वारे प्रसिध्दी करण्यात यावी तसेच आपल्या क्षेत्रातील​ सार्वजनिक रूग्णालय , खाजगी रूग्णालयातील डाक्टर्स ची बैठक आयोजित करून त्यांना सतर्क राहण्यास सांगण्यात यावे तसेच बाधित रूग्णांसाठी आईसोलेशन कॅम्प तयार करण्यात यावे. या सर्व उपायांची शिस्तबद्ध​ रितीने अंमलबजावणी करावी असे आदे मुख्यसचिव यांनी दिले आहेत.

 

 

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.