केंद्राचे कर्मचारी-पेन्शनधारकांना गिफ्ट

0
734

नवी दिल्ली : दि. १३ : केंद्र सरकारचा आज पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयानुसार, केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ केली जाणार आहे. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील मंत्रिमंडळाच्या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ करत तो २१ टक्के इतका करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा फायदा ३८ लाख कर्मचारी आणि ६५ लाख पेन्शनर्सना होणार आहे. मात्र, यात लष्कर आणि सुरक्षादलातील कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आलेला नाही. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे केंद्र सरकारवर १४ हजार ५९५ कोटी रुपयांचा भार पडणार आहे. मार्च महिन्याच्या पगारासोबतच केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना महागाई भत्ता मिळणार आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुरागसिंह ठाकूर यांनी राज्यसभेत दिली.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.