सिंधुदुर्ग महोत्सव निमित्त जिल्हास्तरीय भव्य सिंधुदुर्ग गौरव पुरस्कार सोहळा ; नामनिर्देशन करण्याचं आवाहन 

0
135
सिंधुदुर्ग : दि १४ : सिंधुदुर्ग महोत्सव निमित्त जिल्हास्तरीय भव्य दिव्य सिंधुदुर्ग गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्ती, सामाजिक संस्था, पत्रकारिता, राजकारण अशा सर्वांना पुरस्कारसाठी नामनिर्देशन करण्याचं आवाहन करण्यात  आहे. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ८ तालुक्यातील ८ लोकप्रतिनिधीना सर्वोत्कृष्ट लोकप्रतिनिधी पुरस्कार, ८ तालुक्यातील ८ जि.प.सदस्यांना  सर्वोत्कृष्ट जिल्हा परिषद सदस्य पुरस्कार, सर्वोत्कृष्ट पत्रकार पुरस्कारासाठी २ पुरस्कार प्रिंट मीडिया, सोशल मीडिया, जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट दैनिक, सर्वोत्कृष्ट अभिनेता व अभिनेत्री,  ८ तालुक्यातील ८  ग्रामपंचायतना सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत, सर्वोत्कृष्ट सहकारी संस्था व पतपेढी बँक, सर्वोत्कृष्ट दशावतार मंडळ, सर्वोत्कृष्ट भजनी बुवा (वय ३० पेक्षा अधिक), सर्वोत्कृष्ट युवा भजनी बुवा ( वय ३० च्या आत ), सर्वोत्कृष्ट पंचायत समिती पुरस्कार, सर्वोत्कृष्ट युवा नेतृत्व,सर्वोत्कृष्ट गणेश मूर्तिकार, सर्वोत्कृष्ट न्युज चॅनल, ८ तालुक्यातील ८ सरपंचांना सर्वोत्कृष्ट सरपंच, ८ तालुक्यातील ८ नगरसेवकांना  सर्वोत्कृष्ट नगरसेवक, सर्वोत्कृष्ट युवा नेता, सर्वोत्कृष्ट समुह नृत्य कलाकार, सर्वोत्कृष्ट ढोल ताशा पथक, सर्वोत्कृष्ट उद्योजक,  सर्वोत्कृष्ट फोटोग्राफर, सर्वोत्कृष्ट शिक्षक व शिक्षिका असे २ पुरस्कार जाहीर केले जाणार आहेत. या सर्व पुरस्कारांसाठी नॉमिनेशन फॉर्म लवकरच उपलब्ध केले जाणार असून अधिक माहितीसाठी 8369494596 या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here