बेळणे खुर्द प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांनी भरवला गावठी बाजार; विद्यार्थ्यांना आली व्यावहारिक जगाची अनुभूती

0
481

कणकवली : दि. १५ : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा बेळणे खुर्द, तालुका कणकवली येथे वैशिष्ट्यपूर्ण नाविन्यपूर्ण गावटी बाजार भरविण्यात आला. हा उपक्रम बेेळणे शाळेच्या वतीने घेण्यात आला. कार्यक्रमाला विस्तार अधिकारी पाताडे, सरपंच श्रीमती दीक्षा चाळके, केंद्रप्रमुख श्रीमती जुईली सावंत, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष, सदस्य, ग्रामसेवक वैभव ठाकूर, शिक्षक, ज्येष्ठ नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी भाजीपाला, कळींगण, तसेच इतर जीवनावश्यक वस्तू गावटी  बाजारात विक्रीसाठी ठेवल्या  होत्या. यावेळी मोठ्या प्रमाणात उलाढाल  झाली. यावेळी विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञान व त्या विषयाचे मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभव कथन केले. प्रशालेचे पदवीधर शिक्षक मंगेश राणे यांनी सूत्रसंचालन केले.आभार व प्रास्ताविक श्रीमती सामंत यांनी केले. गावठी बाजाराला यावेळी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.