कर्फ्यू असूनही जनतेसाठी उद्या दोडामार्ग शिवसेना कार्यालय राहणार सुरू ; आपत्कालीन स्थितीत करणार सर्वांना सहकार्य : तालुकाप्रमुख बाबुराव धुरी

0
255

दोडामार्ग, दि. २१ : प्रशासनाने २२ मार्चला जनता कर्फ्यूची हाक दिली असून त्याची संपूर्ण देशात अमंलबजावणी होत आहे. अशावेळी दोडामार्ग तालुक्यातील जनतेची आपत्कालीन परिस्थितीत होणारी गैरसोय टाळण्यासाठी व रुग्ण वा नागरिकांवर योग्य उपचार होणे, तात्काळ आरोग्य सेवा देणे यासाठी उद्या दोडामार्ग तालुका शिवसेना मध्यवर्ती कार्यालय सुरू राहणार असल्याची माहिती तालुकाप्रमुख बाबुराव धुरी यांनी सिंधुदुर्ग लाईव्हशी बोलताना दिली. यावेळी त्यांच्यासमवेत विभागप्रमुख संतोष मोर्ये, लक्ष्मण आयनोडकर, विजय जाधव, उपस्थित होते. नागरिकांना आपत्कालीन समयी मदत देता यावी यासाठी उद्या खास शिवसेनेकडून भगवा झेंडा लावलेली बोलेरो गाडी एम.एच. 07 एजी 3162 जनतेच्या वैद्यकीय सेवेसाठी शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाकडे उपलब्ध राहणार असल्याचेही ते म्हणाले. शिवाय ज्या नागरिकांनी आपत्कालीन समयी मदत आवश्यक असेल त्यांनी तालुकाप्रमुख बाबुराव धुरी 9421265168, युवा सेना उपतालुकाप्रमुख भगवान गवस 9764902557 कार्यालयप्रमुख गुरुदास सावंत 9422484423 यांच्याशी संपर्क साधायचा आहे असे आवाहन केले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here