जनता कर्फ्युमधून आरोग्यसेवा, पोलीस आणि मीडियाला वगळले

0
147

सावंतवाडी, दि. २१ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवार दि. २२ मार्च रोजी सकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत जनता कर्फ्यु पाळावा, असे आवाहन केले आहे. या जनता कर्फ्युतून वैद्यकीय सेवा, पोलीस, मीडिया यांना वगळण्यात आले आहे. त्याचबरोबर दूध पुरवठा, औषध दुकाने या सेवाही वगळण्यात आल्या आहेत. कोरोना विरुद्धच्या लढ्यात देशाची एकजूट झाली पाहिजे. त्याचबरोबर कोरोनविरोधातील लढ्यात जे रात्रंदिवस राबत आहेत, त्या पोलीस कर्मचाऱ्यांचे, डॉक्टर्स, नर्स आणि मीडियाचे आभार मानावेत. असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here