उंबर्डे ग्रामपंचायतीमार्फत मास्क वाटप..!

0
519

वैभववाडी, दि. ०१ : वैभववाडी तालुक्यातील उंबर्डे ग्रामपंचायतीमार्फत सोमवारी ३० मार्चला शासकीय कर्मचाऱ्यांना मास्क वाटप करण्यात आलं. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावामध्ये अहोरात्र झटणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना उंबर्डे ग्रामपंचायतमध्ये सरपंच शेरपुद्दिन  बोबडे, उपसरपंच दशरथ दळवी यांच्या हस्ते मास्कच वाटप करण्यात आलं. गावातील पोलीस पाटील, ग्रामसेवक, आरोग्य विभागाचे कर्मचारी, तलाठी, सोसायटीचे कर्मचारी, ग्रामपंचायतीचे कर्मचारी यांना मास्कच वाटप करण्यात आलं.  यावेळी पोलीस पाटील विजय दळवी, तलाठी सुदर्शन पाटील, संदी शिंदे, ग्रामसेवक नयना गुरखे, पोस्ट मास्तर भाई पवार, रफिक बोबडे, जयसिंग जैतापकर, ग्रा. पं सदस्य उदय मुद्रस, शैलेश दळवी, काशिनाथ कदम, तुषार शिंगरे, उमर रामदुल, मा. तंटामुक्त समिती अध्यक्ष व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.