रोजंदारी कामगारांच्या मदतीला धावला श्री गणेश माऊली लाॅजिस्टीक ग्रुप..!

0
177

वेंगुर्ला, दि. ०९ : श्री गणेश माऊली लाॅजिस्टिक ग्रुपतर्फे कोरोना व्हायरस संकटामुळे आर्थिक संकटात सापडलेले रेडी गावामधील रोजंदारी वर काम करणाऱ्या ५० ग्रामस्थांंना जीवनावश्यक वस्तूंंचे वाटप करण्यात आले. हे वाटप करताना भाजप वेंगुर्ला तालुका उपाध्यक्ष, माजी आरोग्य, शिक्षण, सभापती, रेडी जि.प.सदस्य प्रितेश राऊळ, रेडी पंचायत समिती सदस्य मंगेश कामत, रेडी ग्रामपंचायत सरपंच रामसिंग राणे, ग्रामपंचायत सदस्य संजय कांबळी, विनायक नाईक, श्री गणेश माऊली लाॅजिस्टिक या ग्रुपचे सर्व सदस्य उपस्थित होते.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.