फोंडाघाटच्या चव्हाण कुटुंबियांचे प्रमोद जठारांकडून सांत्वन

0
606

कणकवली : पश्चिम रेल्वेच्या बोरिवली- कांदिवली  स्थानकादरम्यान पोईसर जवळ रेल्वे रूळ ओलांडत असताना फोंडाघाट नवीन कुर्ली वसाहत येथील चार तरुणांचा दुर्दैवी अंत झाला. या चारही तरुणांचे पार्थिवावर  कुर्ली वसाहत येथे मंगळवारी सकाळी अंत्यविधी करण्यात आले. याप्रसंगी मनोहर चव्हाण व संपत चव्हाण यांच्या घरी जावून माजी आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी सांत्वन केले. कणकवली तालुक्यातील फोंडाघाटच्या नवीन कुर्ली वसाहत येथील सागर संपत चव्हाण (२३) साईप्रसाद मनोहर चव्हाण (१७) दत्तप्रसाद मनोहर चव्हाण (२०)मनोज दीपक चव्हाण (१८) हे चारही तरुण सोमवारी सकाळी ६.३० वा च्या सुमारास बोरिवली- कांदिवली स्थानकादरम्यान अपघात झाला होता चारही तरुण नात्याने सख्खे चुलत भाऊ आहेत. दत्तप्रसाद व साईप्रसाद कणकवली एसटी आगाराचे वाहक मनोहर चव्हाण यांचे आहेत. ह्या दुर्दैवी घटनेची बातमी समजताच माजी आमदार प्रमोद जठार यांनी चव्हाण कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी त्यांच्या सोबत भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राजन चिके, तालुका उपाध्यक्ष सुभाष सावंत, फोंडाघाट सोसा चेअरमन राजन नानचे उपस्थित होते.    

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.