खा. विनायक राऊत यांचा दौरा हा आवश्यक चाचण्या, परवानगी पूर्ण करूनच : संजय पडते

0
613

कुडाळ : दि २२ : खासदार विनायक राऊत लॉकडाऊन असताना ही सिंधुदूर्ग दौऱ्यावर असल्याने काही विरोधी पक्षाची मंडळी खासदार विनायक राऊत व त्यांच्या संर्पकातील लोकांना होम क्वारंटाईन करण्याची मागणी करत आहेत, अशी मागणी करण्यापूर्वी भाजपच्या पदाधिकारी यांनी पूर्ण माहिती घेणे आवश्यक होते. परंतु संपूर्ण महाराष्ट्र कोरोना संकटात असतानाही कोरोनाबाबतचे गांभिर्य बाजूला ठेवून केवळ प्रत्येक गोष्टीचे राजकारण करण्याचे गलीच्छ काम भाजपची ही सर्व विघ्नसंतोषी मंडळी करीत आहेत. त्यामुळे सिंधुदूर्ग जिल्हयातील स्वाभिमानी भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून शिवसेना वेगळी अपेक्षा करीत नाही. लोकसभेचे अधिवेशन संपण्यापूर्वी  एक दिवस अगोदर म्हणजेच 22 मार्च 2020 रोजी संपूर्ण भारत देशासह महाराष्ट्रामध्ये लॉक डाऊन सुरू झाले होते. दिनांक 23 मार्च 2020 रोजी संसदेचे अधिवेशन संपले खा.विनायक राऊत हे आपल्या मुंबई निवासस्थानी दाखल झाले. त्यावेळेपासून अगदी 17 एप्रिल 2020 पर्यत खासदार राऊत साहेब मुंबई निवासस्थानी सुमारे 25 दिवस होम क्वारंटाईन राहिले. वरील होम क्वारंटाईन कालावधीत मुंबईतून रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभा मतदार संघात प्रशासन व जनतेशी फोनद्वारे संपर्क ठेवून माहिती घेत होते. तसेच हजारोंच्या संख्येने तळागाळातील नागरिकांचे त्यांना फोन येत होते. त्यांना आवश्यक असलेली मदत ते करत होते. कारण आमचे खासदार तळागाळापर्यंत संपर्क असलेले नेते आहेत… आपल्या नेत्यांप्रमाणे उंटावरुन शेळ्या हाकणारे नाहित  तदनंतर रितसर वैदयकीय तपासणी करून व प्रशासनाची आवश्यक ती परवानगी घेऊनच खा.राऊत त्यांचा मुलगा गितेश व मुलगी कु.रूची यांना सोबत घेऊन एकाच गाडीने मुंबईहुन सिंधुदूर्ग जिल्हयात दाखल झालेले आहेत. येताना आपल्या गाडीला ड्रायव्हर तसेच मुंबईतील अंगरक्षकही न घेता  सदरची गाडी त्यांचा मुलगा गितेश यांनी चालवित आणली आहे.खा.राऊत यांनी त्यांची गाडी वगळता अन्य एकही गाडी सोबत आणली नाही. त्यामुळे खा.राऊत क्वारंटाईन नियमावली तोडली म्हणणे मूर्ख पणाचे आहे. सिंधुदुर्ग जिल्हयात दाखल झाल्यानंतर लोकसभा मतदार संघातील जनता व प्रशासन यांच्याशी संवाद साधून आवश्यक ती मदत करण्याचे व लोकांना धीर देण्याचे काम रत्नागिरी -सिंधुदूर्ग या  जिल्हयाचे खासदार या नात्याने प्रामाणिकपणे करत आहेत. याउलट भाजपाचे आमदार प्रसाद लाड हे मुंबईवरुन केवळ दिखावा करण्यासाठी मुंबईवरुन सिंधुदुर्गात आले… त्यावेळी आपण डोळे बंद करुन घेतले होते का? दुसरीकडे मुंबईवरुन भाजपचे आमदार नितेश राणे जिल्ह्यात आल्यानंतर आपण ५ दिवसाचं क्वारन्टाइन राहिल्याच सांगतात परन्तू नियमाप्रमाणे बाहेरगावावरुन आल्यानंतर प्रथम १४ दिवस सरकारी रुग्णालयात आणि नंतर घरी १४ दिवस अशाप्रकारे क्वारन्टाइन केलं जातं हे आमदार नितेश राणे आणि त्यांच्या पदाधिकारी लोकांना समजू नये यासारखं जिल्ह्याचं दूर्दैव नाही त्यामुळे स्वत: काहीही न करणाऱ्या विरोधी पक्षाच्या मंडळीच्या पोटात पोटशुळ उठत असून त्यांच्या महाराष्ट्रातील बडया नेत्यांप्रमाणेच केवळ शिवसेना नेत्यांवर कुरघोडी करण्याचे काम स्वाभिमानी भाजपची मंडळी करीत आहेत. हे जनतेला ज्ञात आहे. संपूर्ण जिल्हा व राज्यातून आपल्या राज्यातील उपाययोजनांसाठी उपयोगी होणाऱ्या मुख्यमंत्री रिलीफ फंडात मदत जमा होत असताना ह्या जिल्ह्यातील भाजपाचे नेते मात्र आपल्या राजकीय स्वार्थासाठी प्रधानमंत्री फंडामध्ये मदत करा असे आवाहन करत होते,यातून यांची राज्य व जिल्ह्यातील जनातेबद्दलची आत्मीयता दिसून आलेली आहे चोराच्या उलटया बोंबा या म्हणीप्रमाणे स्वाभिमानी भाजप मंडळीची स्थिती आहे. संपूर्ण लॉक डाऊन कालावधीत स्वाभिमानी भाजपचे आत्ता पोपटपंची करणारे टिकाकार जिल्ह्यात कुठेही दिसलें नाहीत . ते पूर्णत:होम क्वारंटाईन होते. फक्त खासदार राऊत यांचा वर टिका करून आपल्या नेत्यांची मर्जी सांभाळण्यासाठी प्रसिद्धी माध्यमातुन दिसत आहेत. आमचं नेतृत्त्व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्रातील जनतेची काळजी कुटुंबप्रमुख या नात्याने घेत आहेत. त्यांचे शिवसैनिक त्यांच्या आदेशाप्रमाणे कोणतही राजकारण न करता जनतेच्या मदतकार्यात शांतपणे सहभाग घेत आहेत. उगाचच नेत्याना खुश करण्यासाठी शिवसेना नेत्यांवर नाहक टिका करु नये असे संजय पडते यांनी टीका केली आहे

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.