सतर्क आशास्वयंसेविकेचा वैभववाडी तहसीलदारांकडून सत्कार..!

0
786

वैभववाडी, दि. २२ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहून काम करणाऱ्या नावळे येथील आशा स्वयंसेविका साक्षी शेळके यांचा तहसीलदार रामदास झळके यांनी सत्कार केला. शेळके यांनी मुंबईवरुन चालत आलेल्या इसमाची तात्काळ माहिती शासकीय यंत्रणेला दिली होती. त्यांच्या या सतर्कतेबद्दल त्यांना गौरविण्यात आले. कोरोनाविरोधात सर्वच शासकीय यंत्रणा काम करीत आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा कोरोनामुक्त होण्यासाठी या यंत्रणेने विशेष मेहनत घेतली. भविष्यातील दक्षता म्हणून परगावाहून येणाऱ्यांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहेत. मात्र, असे असतानाही सोमवारी मुंबईवरून नावळेत एक व्यक्ती पायी चालत आली. संचारबंदीनंतरही रेड झोनमधून आलेल्या त्या व्यक्तीची माहिती गावातील साक्षी शेळके यांनी तात्काळ आरोग्य विभागाला दिली. आरोग्य यंत्रणेने तात्काळ त्या व्यक्तीची आरोग्य तपासणी करुन इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन केले. आशा स्वयंसेविकेने तत्परता दाखवून केलेल्या कामाबद्दल तहसीलदार रामदास झळके यांनी त्यांच कौतुक केले. त्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी शुभदा पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डाँ. उमेश पाटील उपस्थित होते.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.