शेतकऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करू नये – मंगेश तळवणेकर

0
623

सावंतवाडी : सावंतवाडी – दोडामार्ग तालुक्यातील २५ गावांमध्ये वृक्षतोड बंदी आहे. कोर्टाच्या आदेशाचे तंतोतंत पालन संबधित गावातील ग्रामस्थांकडून होत आहे. भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे जिल्हाध्यक्ष खोट्या बातम्या पसरवून ग्रामस्थांचा अवमान करत आहेत. शहरात बसून कुणा फाऊंडेशनला हाताशी धरून शेतकऱ्यांना त्रास देण्याचा हा प्रयत्न आहे. असा आरोप माजी शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर यांनी पत्रकार परिषदेत केलाय. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत झालेल्या चर्चेवेळी बंदी झालेल्या २५ गावात वृक्षतोड झाली असेल तर कोर्टात अवमान याचिका दाखल करता आली असती, असे म्हटले होते. मग आता ही याचिका सरकारने दाखल करण्यास हरकत नसल्याचे भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष जयंत बरेगार यांनी म्हटले आहे. याबाबत  पत्रकार परिषद घेवून मंगेश तळवणेकर यांनी या आरोपांचे खंडन केले. यावेळी सरमळे सरपंच रसिका सावंत, उपसरपंच समीर गावडे, नाना गावडे, संजय गावडे आदी उपस्थीत होते. 

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.