मुख्यमंत्री सहाय्यता निधीस प्राथमिक शिक्षक पतपेढीची ५१ हजारांची मदत ; अध्यक्ष विठ्ठल गवस यांनी उपजिल्हाधिकारी यांचेकडे सुपूर्द केला धनादेश

0
531

सिंधुदुर्ग : दि २२ : कोरोना आपत्ती निवारणासाठी प्राथमिक शिक्षक पतपेढीतर्फे मुख्यमंत्री साहाय्यता निधीस ५१ हजारांची आर्थिक मदत करण्यात आली आहे. मदतीचा धनादेश पतपेढीचे अध्यक्ष विठ्ठल गवस यांनी निवासी जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. संपूर्ण देशात व महाराष्ट्र राज्यात कोरोना प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आर्थिक परीस्थितीचा संचालक मंडळाने विचार करून धर्मादाय फंडातील ५१ हजार रुपये इतकी आर्थिक मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीस करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार ही मदत जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी विठ्ठल गवस यांचे समवेत शिक्षक पतपेढीचे उपाध्यक्ष राजेंद्रप्रसाद गाड, संचालक नामदेव जांभवडेकर, दिनकर तळवणेकर, सचिव राजन भोगले, समीर नातू आदी उपस्थित होते. जिल्हा प्रशासनाने प्राथमिक शिक्षक पतपेढीने मुख्यमंत्री साहाय्यता निधीस केलेल्या आर्थिक मदतीबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.