आरवली वेळागर येथील गरजू परप्रांतीयांना सद्गुरू बालदत्तनाथ संस्थेमार्फत धान्य वाटप

0
752

वेंगुर्ला : दि २५ : आरवली वेळागर येथील गरजू परप्रांतीय कामगारांना सद्गुरू बालदत्तनाथ संस्थे मार्फत धान्य वाटप करण्यात आले. लॉकडाऊनमुळे अनेक ठिकाणी कामगार अडकून पडले आहेत. असेच कामगार शिरोडा वेळागर येथे अडकले आहेत. या परप्रांतीय कामगारांना आरवली येथील सद्गुरू बालदत्तनाथ यांच्या अनादि सनातन मानवता सत्य धर्म जनजागृती विश्व बंधुत्व शांती केंद्र संस्थेतर्फे त्या कामगारांची जेवणाची व राहण्याची सोय करण्यासाठी क्षेत्राधिकारी आजोबा यांनी स्वतः जाऊन मदत केली. स्वयं ब्रह्मपुरी पुण्यभूमि आरवली सोन्सुरे येथील शिवसद्गुरु बाल दत्तनाथ यांच्या प्रेरणेने अनादि सनातन मानवता सत्य धर्म जनजागृती विश्व बंधुत्व शांती केंद्र संस्था यांच्या विद्यमाने आरवली वेळागर येथे मध्यप्रदेश मधील पंधरा कामगार व त्यांची लहान मुले भुकेने व निवारा नसल्याने जंगलात उन्हात राहत असल्याचे शिवचैतन्य आजोबांना यांना समजताच आजोबा व संस्थेचे पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी जाऊन कामगारांची विचारपूस करून त्यांना शिधा वाटप करून त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली. कामगारांसाठी साध्या झोपडीची सुद्धा व्यवस्था व्यवस्था नसल्याचे दिसले खाण्यापिण्यासाठी काहीही नाही संबंधित दित त्यांनी ज्यांनी कोणी त्यांना कामासाठी आणले ते त्यांना साधे पाहत सुद्धा नसल्याने छोट्या छोट्या मुलांना घेऊन ते अंधारात व व उन्हात राहत आहेत त्यांना त्यांच्या मध्यप्रदेशमध्ये गावात जायचं आहे परंतु लोक डाऊन असल्याने ते जाऊ शकत नाहीत त्यांना निवाऱ्याची अत्यंत गरज असल्याने प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेऊन या कामगारांना न्याय द्यावा अशी मागणी कामगार व संस्थेचे पदाधिकारी करीत आहेत. त्यांना शिधावाटप करण्यासाठी आजोबा, यदुनाथ चिपकर, अनंत मगर, संजय गडेकर, प्रितम सावंत आदी उपस्थित होते

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.