मत नोंदवा ; चाकरमान्यांना आणावं की नको ?

0
51737

कोरोना हळूहळू हात-पाय पसरतोय. अनेकांना मृत्यूच्या बाहुपाशात लपेटतोय. सिंधुदुर्ग मोठ्या धीराने कोरोनाशी लढतोय. मुंबईत आमचे चाकरमानी कोरोनाशी संघर्ष करताहेत. चाकरमानी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाते अतूट. दोघेही एकमेकांशिवाय जगू शकत नाहीत. कोरोनाच्या संकटाने मात्र एक नवा पेच निर्माण केला आहे. कोरोनाच्या या संकटामुळे चाकरमान्यांना आपल्या गावाकडे परतायचे आहे तर सुरक्षेच्या कारणामुळे गाववाले चाकरमान्यांना मुंबईतच थांबण्याची विनंती करताहेत. अशा स्थितीत आपले मत या समस्येवर शोधण्यात येत असलेल्या पर्यायांना एक दिशा देऊ शकते. यासाठीच चाकरमान्यांना गावाकडे आणावे की आणू नये, यावर खालील लिंकवर क्लिक करून आपले मत जरूर नोंदवा. आपल्या एका मतामुळे सरकारला याबाबत निश्चित असे पाऊल उचलता येईल. लक्षात ठेवा, सिंधुदुर्ग आणि पर्यायाने कोकणच्या भवितव्यासाठी आपले याबाबतचे मत अनमोल आहे. धन्यवाद !

[democracy id=”3″]

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here