आमदार वैभव नाईक यांच्या आमदार निधीतून जिल्हा रुग्णालयात ५०० पीपीई किटचे वाटप..!

0
383

सिंधुदुर्गनगरी, दि. २७ : आमदार वैभव नाईक यांच्या आमदार निधीतून हाफकीन इन्स्टिट्यूटच्या मान्यतेने ५०० पीपीई किट खरेदी करण्यात आली असून याचे वाटप आज ओरोस जिल्हा रुग्णालयात आ. वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. आ. वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून व जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या तत्परतेमुळे महाराष्ट्र राज्यात प्रथमच आ. वैभव नाईक यांचा आमदार निधी पीपीई किटसाठी मंजूर करण्यात आला. प्रत्यक्षात हे किट उपलब्ध करून वाटप करण्यात आले. सध्या सिंधुदुर्ग जिल्हयात कोरोनाचा रूग्ण नसला तरी कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांसाठी पीपीई किट अत्यंत आवश्यक आहेत. पीपीई किटअभावी डॉक्टरांची गैरसोय होऊ नये यासाठी आ. वैभव नाईक यांनी आपला आमदार निधी जिल्हा आरोग्य यंत्रणेसाठी दिला आहे. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीपाद पाटील, डॉ. अनिलकुमार देसाई, जि. प. गटनेते नागेंद्र परब, महिला जिल्हा प्रमुख जान्हवी सावंत, ओरोस विभागप्रमुख नागेश ओरोसकर, उदय जांभवडेकर, योगेश तावडे, सुनील जाधव आदी उपस्थित होते.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.