आबा कोंडस्करांच्या डोळ्यावर झापड; कोकणी माणसाच्या काळजीसाठी निलेश राणे समर्थ; जि. प. सदस्य प्रितेश राऊळ यांचे प्रत्युत्तर

0
532

वेंगुर्ला : दि. ०४ : माजी खासदार निलेश राणे यांच्यावर टीका करून उजेडात येण्याचा आबा कोंडस्कर सारख्या अडगळीत पडलेल्या माणसाचा केवीलवाणा प्रयत्न चालला आहे. राणे कुटुंबीयांवर टीका करून तरी शिवसेनेत मोठे होता येईल यासाठी त्यांचे हे प्रयत्न असतील तर आमच्या त्यांना शुभेच्छाच असतील. सत्ता आणि पद नसतानाही निलेश राणे यांनी जे काम लॉकडाऊनच्या काळात केले आहे, ते सत्ताधारी खासदारालाही जमले नाही. त्यांच्या कामानेच आबा कोंडस्करांच्या डोळ्यावर झापड आली आहे. कोकणी माणसाच्या काळजीसाठी निलेश राणे समर्थ असल्याच घणाघाती प्रत्युत्तर आबा कोंडस्करांच्या टीकेला जि. प. सदस्य प्रितेश राऊळ यांनी दिलंय. राणे परिवाराने उभी केलेली इंजिनीयरिंग कॉलेजेस, मेडिकल हॉस्पिटल हि जनतेच्या जीवावर नव्हे, तर जनतेच्या प्रेमापोटी त्यांच्या निरोगी जीवनासाठी उभी केली आहेत, हे समजण्याएवढी कोंडस्कर यांची लायकीच नाही, हे आम्ही जाणतो. त्यामुळे भाजपा नेते निलेश राणे यांचे मानसिक संतुलन ढासळल्याची टीका देखील त्याच बालबुद्धीतून केलेली टीका असल्याच त्यांनी सांगितलं. मानसिक संतुलन कोणाचे ढासळले आहे हे त्यांनी शोधण्यासाठी त्यांनी आपल्या नेत्यांकडे पाहण्याची गरज आहे. मुंबईतून सहा गाड्या आणि स्वतःच्या कुटुंब व कार्यकर्त्यांना घेऊन कोकणात येणे, स्वतःला क्वारंटाइन करून न घेता कोकणात फिरून इथल्या जनतेचे जीवन धोक्यात घालणे, जमावबंदीला फाट्यावर मारत मास्कही न लावता टोळक्याने फिरणे आणि विषय अंगलट आल्यानंतर गुपचूप मुंबईला पळून जाणे हि सगळी मानसिक संतुलन ढासळल्याची चिन्हे त्यांनी आपल्या पक्षातच शोधावीत. डोळ्यावर बांधलेली हुजरेगिरीची झापडे उतरवली तर जनतेच्या अडचणीच्या काळात काडीची मदत न करता फक्त फोटोतून शोशायनिंग करण्याची मानसिक विकृती कोंडस्कराना त्यांच्या पक्षातच दिसेल. त्यासाठी राणेंच्या कुटुंबाची उष्टावळ काढायची वेळ येणार नाही. असही प्रीतेश राऊळ यांनी म्हटलं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.