शिक्षक प्रामाणिकपणे पार पडतायेत आपली जबाबदारी ; सरपंच संघटनेने अनावश्यक आरोप करू नयेत : शिक्षक संघटनेच आवाहन

0
592

सिंधुदुर्गनगरी, दि. १० :  कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व या आपत्कालिन परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी गावातील प्राथमिक शिक्षक या नात्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जी कर्तव्य पार पाडण्याचे आदेश दिले ती सर्व प्रकारची कर्तव्य प्राथमिक शिक्षक प्रामाणिकपणे पार पडत असून, वरिष्ठ अधिकारी यांनी ठरवून दिलेली कर्तव्य पार पाडण्यास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षक संघटनांचा विरोध नाही. त्यामुळे सरपंच संघटनेने अनावश्यक आरोप टाळावेत असं आवाहन प्राथमिक शिक्षक समिती शाखा सिंधुदुर्गन केल आहे. कोरोना प्रादुर्भावाचा धोका असूनसुद्धा शाळेत जाऊन शालेय पोषण आहार वितरीत करणे, संस्थात्मक विलगीकरण कक्ष तयार करण्यासाठी शाळेत शिपाई नसतानासुद्धा शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षक पालक संघाच्या सहकार्याने विलगीकरण कक्षासाठी आवश्यक सर्व भौतिक सुविधांची पूर्तता शाळांमध्ये करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त सामाजिक बांधिलकी म्हणून शिक्षकांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला एक दिवसाचे वेतन दिले. प्रत्येक तालुक्यातील गावागावातील गोरगरिब, गरजू लोकांना घरोघरी व वस्तीवर जाऊन प्रत्येक तालुक्यात लाखो रुपयांचे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप व आर्थिक मदत करण्यात आलेली आहे, सद्यस्थितीत करतही आहेत. तसेच, आरोग्य प्रशासनाच्या आवाहनानुसार रक्तदान प्राथमिक शिक्षकांनी केलेले आहे. जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्या आदेशान्वये मुख्यकार्यकारी अधिकारी, जि. प. सिंधुदुर्ग यांनी 8 मे २०२० च्या आदेशान्वये मुख्याध्यापक व शिक्षक यांनी आपत्कालिन परिस्थितीत जी जबाबदारी व कर्तव्य पार पाडण्याचे आदेश दिले आहेत. ती ती सर्व प्रकारची कर्तव्य शिक्षक विहित वेळेत पार पाडत आहेत. मात्र शिक्षकांवर आरोप करण्यात येत असून अत्यंत चुकीचे आहेत. कोरोनापार्श्वभूमीवर प्रशासनाने ज्या ज्या घटकावर जी जी जबाबदारी सोपवलेली आहे ती ती जबाबदारी एकमेकांशी सुसंवाद आणि सहकार्याची भूमिका ठेवून पार पाडावी अशी शिक्षक समितीची स्पष्ठ भूमिका असल्याचे प्राथमिक शिक्षक समिती शाखा सिंधुदुर्गच्या वतीने जिल्हाध्यक्ष नितीन कदम, जिल्हासरचिटणीस सचिन मदने, शिक्षक नेते नंदकुमार राणे, कार्याध्यक्ष नारायण नाईक, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रसेन पाताडे, लवू चव्हाण ,राज्य उपाध्यक्ष राजन कोरगावकर, जेष्ठ मार्गदर्शक भाई चव्हाण, चंद्रकांत अणावकर ,प्रवक्ता सुनिल चव्हाण,राज्य महिला आघाडी सल्लागार सौ सुरेखा कदम आदींनी प्रसिध्दी पत्रकात स्पष्ट केलंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.