आ. नितेश राणेंनी कणकवलीतील सरपंचांशी झूम अॅॅपद्वारे साधला संवाद; क्वारंटाईन व्यवस्था, आरोग्य, प्रशासन यासंदर्भात घेतली माहिती; प्रशासन आणि सरपंच यातील सेतूची भूमिका बजावणार नितेश राणे

0
1420

कणकवली : आमदार नितेश राणेंनी कणकवली तालुक्यातील सरपंचांशी थेट साधला संवाद // कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झूम ऍपच्या माध्यमातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सरपंचांशी केली बातचीत // लॉकडाऊनमुळे जिल्ह्याबाहेर अडकलेले चाकरमानी, विद्यार्थी, यात्रेकरू आणि अन्य जनतेला आणण्यात येणार आहे गावी // ग्रीन, ऑरेंज सोबत रेड झोनमधील जिल्ह्याबाहेरील नागरिकही येणार आहेत सिंधुदुर्गात // या सर्वांना त्या त्या गावातील शाळांमध्ये करण्यात येणार आहे संस्थात्मक क्वारंटाईन // शासनाने याची संपूर्ण जबाबदारी सोपवलीय ग्रामसनियंत्रण समितीवर // सरपंचाच्या अध्यक्षतेखाली शासनाने बनवलीय समिती // क्वारंटाईन केलेल्या नागरिकांची सर्व जबाबदारी असणार या समितीवर // या पार्श्वभूमीवर आमदार नितेश राणे यांनी कणकवली तालुक्यातील सरपंचांशी आज साधला संवाद // प्रत्यक्षात संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये येणाऱ्या अडचणी, आवश्यक उपाययोजना, घ्यावयाची खबरदारी याबाबत सरपंचांशी वन टू वन केली चर्चा // सरपंचांनी मनमोकळेपणाने मांडल्या आपल्या समस्या // आम्ही गावात येणाऱ्या चाकरमानी व अन्य नागरिकांच्या स्वागतासाठी आहोत तयार // मात्र, प्रशासनाने द्यावे पूर्ण सहकार्य // क्वारंटाईन करण्यात येणाऱ्या नागरिकांची द्यावी पूर्वकल्पना // केवळ अर्धा ते एक तास आधी गावात क्वारंटाईन करण्यात येणार असल्याची दिली जाते आरोग्य विभागाकडून माहिती // काही शाळांमध्ये नाहीत पुरेसे संडास, बाथरूम // पाण्याचीही आहे टंचाई // क्वारंटाईन केल्या जाणाऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था कोण करणार ? // संस्थात्मक क्वारंटाईन केलेले नागरिक शाळेतून बाहेर जातात का याची दिवसा आणि रात्री कोणी पाहणी करायची ? // सिंधुदुर्गातील आधारकार्ड, रेशनकार्ड, किंवा मतदानकार्ड असणारे जे नागरिक जिल्ह्याबाहेर अडकलेत त्यांना प्राधान्याने आणा जिल्ह्यात // आंबा वाहतुकीसाठी रेड झोन मध्ये जाणाऱ्या चालकांची नियमाने ग्रामस्थ नियंत्रण समितीला माहिती देणे संबंधितांवर आहे बंधनकारक // परंतु आंबा वाहतूक करणारे चालक गावातील यंत्रणेला देत नाहीत माहिती // लोरे नं १ सरपंच अजय रावराणे यांनी व्यक्त केली खंत // रेड झोनमधून आल्यानंतर क्वारंटाईन केलेल्यांवर अपुऱ्या आरोग्य सुरक्षा साधनाशिवाय देखरेख कशी करायची ? // सरपंचांनी मनमोकळेपणे मांडल्या समस्या // आमदार नितेश राणे यांनी सर्व सरपंचांना दिला धीर // प्रशासनाकडे सरपंचाच्या समस्या आणि मागण्या मांडणार // सर्व सरपंचांना पीपीई किट्स पूरविणार // आमदार नितेश राणे यांनी दिला शब्द // कणकवलीप्रमाणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील सरपंचांशी आमदार नितेश राणे साधणार संवाद //

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.