‘आत्मनिर्भर’म्हणजे काय ? मोदींच्या भाषणानंतर नेटकऱ्यांंचं तुफान गुगल सर्च

0
1403

नवी दिल्ली : दि. १३ : काल देशाला उद्देशून केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची अर्थव्यवस्था सुस्थितीत आणण्यासाठी २० लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची केली. त्याचबरोबर देशाला संबोधित करताना नरेंद्र मोदी यांनी आर्थिक सुधारणा वेगाने लागू करण्यात येतील आणि लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्याचे स्वरूप नवे असेल, असे स्पष्ट केले. पण देशाला संबोधित करताना त्यांनी ‘आत्मनिर्भर भारत’ होण्याची गरज असल्याचे म्हटले होते. मोदींनी आपल्या भाषणामध्ये अनेकवेळा आत्मनिर्भर या शब्दाचा उच्चार केला. पण सर्वात मोठे सर्च इंजिन असलेल्या गुगलवर भारतीयांनी आत्मनिर्भर या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मोदींनी आपल्या भाषणाला सुरुवात केल्यापासून चौथ्या मिनिटाला पहिल्यांदा आत्मनिर्भर हा शब्द वापरला. २१ व्या शतकामध्ये आत्मनिर्भर भारत हा एकमेव उपाय असल्याचे मोदी म्हणाले. गुगलवर तेव्हापासून आत्मनिर्भर या शब्दासंदर्भातील सर्व सर्वाधिक वाढल्याचे चित्र सध्या दिसत आहे. मागील १२ तासांमध्ये या शब्दाचा अर्थ जाणून घेण्यासाठी कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र, तेलंगणा, दिल्ली या पाच राज्यांमधील लोकांनी सर्वाधिक प्रयत्न केल्याचे गुगल ट्रेण्डसवरुन दिसून येत आहे.