खासदार विनायक राऊतांकडून रिक्षा चालकांना धान्य वाटप

0
315

वेंगुर्ला : दि. १३ : खासदार विनायक राऊत यांच्या वतीने आज वेंगुर्ले तालुक्यातील रिक्षाचालकांना धान्याचे वाटप करण्यात आले. वेंगुर्ले शहरासह शिरोडा व आरवली येथील रिक्षाचालकांनी या मदतीचा लाभ घेतला. यावेळी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुख विक्रांत सावंत, तालुकाप्रमुख तथा माजी पंचायत समिती सभापती यशवंत परब, उपजिल्हाप्रमुख बाळा दळवी, आबा कोंडस्कर, सचिन वालावलकर, शहर प्रमुख अजित राऊळ महिला संघटक सुकन्या नरसुले, माजी नगराध्यक्ष संदेश निकम, शहर समन्वयक विवेक आरोलकर, युवासेना तालुका अधिकारी पंकज शिरसाट सहित इतर पदाधिकारी उपस्थित होते.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.