सिंधुदुर्ग जिल्हा बँकच्या स्वीकृत संचालकपदी प्रमोद कामत यांची निवड

0
625
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या शुक्रवारी झालेल्या संचालक मंडळ सभेत सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे स्वीकृत संचालक म्हणून सावंतवाडी – नेतर्डे येथील जि .प.चे शिक्षण व आरोग्य सभापती प्रमोद कामत यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६०  मध्ये सहकारी संस्थांच्या व्यवस्थापक समितीवर व स्वीकृत संचालकांच्या नियुक्त्याबाबत तरतूद आहे. सहकारी कायद्यातील व बँकेच्या उपविधीतील स्वीकृत संचालक तरतूद विचारात घेऊन प्रमोद मधुकर कामत यांची बँकेच्या संचालक मंडळावर स्वीकृत सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँकचे अध्यक्ष सतीश सावंत, जि. प. अध्यक्षा सौ. रेश्मा सावंत, बँकेचे संचालक विकास सावंत, अविनाश माणगावकर, विद्याप्रसाद बांदेकर, आत्माराम ओटवणेकर, प्रकाश मोर्ये, मुख्यकार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, आनंद सावंत, संभाजी साटम आदींनी प्रमोद कामत यांचे अभिनंदन केले. प्रमोद कामत यांनी जिल्हा परिषदेमध्ये आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे .विविध शैक्षणिक संस्थांमध्ये पदाधिकारी म्हणुन काम केलेले आहे. तसेच सहकार, सामाजिक, राजकीय क्षेत्रात विविध पदांवर उल्लेखनीय कामकाज केलेले आहे. प्रमोद कामत यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. 
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.