थरारक पाठलागाने बांद्यात ७ लाखाची दारू जप्त ; उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

0
653
सिंधुदुर्गनगरी : राज्य उत्पादन शुल्क विभागाने बांदा येथे गोवा बनावटीची दारूसह सात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही या जिल्ह्यातील एकाच महिन्यातील तिसरी कारवाई असल्याने राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक अतुल कानडे अवैध दारू धंदे करणाऱ्यांचे कर्दनकाळ ठरत आहेत. जिल्ह्यात अवैध दारू धंद्यांना उत आला असतानाच जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक अतुल कानडे अवैध धंद्यांसाठी कर्दनकाळ ठरत आहेत. त्यांचा कारवाईचा सपाटा सुरू असून शुक्रवारी संध्याकाळी उशिरा बांदा येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली. सात लाखांच्या गोवा बनावटीच्या दारूसह मुद्देमाल जप्त केला आहे. बेकायदा दारू वाहतुकी विरोधात राजकुमार बाबुराव चव्हाण व जय रवींद्र बांदेकर यांच्यावर  कारवाई करण्यात आली. यावेळी अवैध दारू धंद्यांविरोधात माहिती देणाऱ्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून योग्य ते बक्षीस देण्यात येईल असे उत्पादन शुल्क विभागाकडून आवाहन करण्यात आलेय.
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.