‘स्पेशल छ्ब्बीस’मधील आनंद सदावर्देमूळे तपासला मिळणार गती – दीक्षितकुमार गेडाम

0
683
सिंधुदुर्गनगरी : निरूखे येथील रामदास करंदीकर यांच्या घरावरील छाप्या प्रकरणी स्पेशल छाब्बीस टीममधील आनंद बाबू सदावर्ते याला पुणे येथून पोलिसांनी ताब्यात घेतले. सदावर्ते यांच्यामुळे पुढच्या तपासाला गती मिळणार असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षित कुमार गेडाम यांनी ‘सिंधूदुर्ग लाईव्ह’शी बोलताना सांगितले. निरूखे येथील रामदास करंदीकर यांच्या घरावरील छाप्या प्रकरणी स्पेशल छाब्बीस टीममधील आनंद बाबू सदावर्ते याला सिंधुदुर्ग पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याला कुडाळ येथील न्यायालयासमोर हजर केले असता कुडाळ न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.  या प्रकरणातील आनंद सदावर्ते हा तीन नंबरचा आरोपी आहे. या स्पेशल छाब्बीस टोळीच्या म्होरक्यासह अन्य पाच जण फरार असून त्यांना लवकरच जेरबंद केले जाईल अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम दिलीय.
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.