येत्या १ दिवसात आंबा कॅनिंग दारात वाढ न झाल्यास आंदोलनाचा इशारा- मनीष दळवी

0
636
वेंगुर्ले : सातत्याने घटत असलेला आंबा कॅनिंगचा दर येत्या १ दिवसात  हंगाम संपेपर्यंत २२ रु ते २५ रु एवढा स्थिर न राहिल्यास सर्व आंबा बागायतदार शेतकरी व स्वाभिमान पक्ष वेंगुर्लेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडु असा इशारा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष वेंगुर्ला चे तालुकाध्यक्ष मनीष दळवी व आंबा बागायतदार शेतकरी यांनी तहसीलदार यांना निवेदनाद्वारे दिला आहे. अवकाळी पाऊस व हवामानामुळे आंबा बागायतदार शेतकरी याना उर्वरित आंबा कॅनिंगला देण्याशिवाय पर्याय उरला नाही. याचाच गैरफायदा आंबा प्रक्रिया कंपन्या घेत असून सातत्याने दर घटवत आहेत. सुरुवातीला २९ रु प्रति किलो असा दर असताना आता हाच दार १६.५० रु एवढा झाल्याने हा आंबा कवडीमोल दराने विकत घेतला जात आहे. अगोदरच पाऊस व हवामानामुळे आंब्याचे नुकसान व त्यात हा कॅनिंगचा दर कमी होत असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या आंबा प्रक्रिया कंपन्या आपल्या फायद्यासाठी शेतकऱ्यांना लुबाडत असतील तर आम्ही आंबा बागायतदार शेतकरी व स्वाभिमान पक्ष गप्प बसणार नाही. त्यामुळे प्रशासनाने याची गंभीर दखल घेत येत्या एका दिवसात याबाबत ठोस पाऊल उचलावे अशा आशयाचे निवेदन वेंगुर्ले तहसीलदार शरद गोसावी याना आंबा बागायतदार शेतकरी व महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष वेंगुर्ले यांच्या वतीने देण्यात आले. यावेळी स्वाभिमान तालुकाध्यक्ष मनीष दळवी, आंबा बागायतदार नितीन कुबल, परबवाडा सरपंच पपू परब, भूषण आंगचेकर, मकरंद प्रभू, नितीन चव्हाण, बाबुराव परब, केदार आंगचेकर, मारुती दौडशानट्टी आदी उपस्थित होते. 
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.