माटणेत जयराज कॅश्यू इंडस्ट्रीजचा आदर्शवत पायंडा

0
463

दोडामार्ग, दि. २५ : कोरोनानं आज साऱ्या जगाला मेटाकुटीला आणले असताना त्यातुन काजू कारखानदार सुद्धा सुटलेले नाहीत. अनेक मजूर व कामगार यांच्यावर कारखाने बंद झाल्याने उपासमारीची वेळ आलेली आहे. मात्र या संकटाला धैर्याने सामोरे जात ज्या मजुरांमुळे आपण कारखाना अविरत कार्यरत ठेवला त्या मजुरांसाठी लॉकडाऊन मध्ये सुद्धा लागेल ती मदत करत माटणे येथील जयराज कॅश्यू इंडस्ट्रीजने एक इतरांसोर आदर्श निर्माण केला आहे.
गोव्यातील युवा उद्योजक विराज शिरोडकर यांचा माटणे येथे जयराज कॅश्यू इंडस्ट्रीज नावाने काजू प्रोसेसिंग कारखाना आहे. खरं तर त्यांचा मोठा उद्योग गोवा राज्यात आहे. मात्र स्थानिकांनी रोजगारासाठी विराज शिरोडकर यांच्या वडिलांकडे या कारखान्याची मागणी केल्याने नुकसान होऊनही त्यांनी माटणे येथे काजू कारखाना सुरू ठेवला आहे. सुमारे ६० हुन अधिक महिला व मजूर या कारखान्यात काम करतात. लॉकडाऊन झाल्याने गेले दोन महिने हा कारखाना त्यांना बंद ठेवावा लागला. त्यामुळे मजुरांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र मालक विराज शिरोडकर यांनी कोरोना ही देशावर आलेली आपत्ती आहे. अशावेळी आपल्या कामगारांना आपणच मदतीचा हात दिला पाहिजे यासाठी लॉकडाऊन कालावधीत त्या सर्व मजूर कुटुंबात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. शिवाय घर खर्चासाठी आवश्यक विना परतावा मदतही केली. आता शासनाने काही अटी शिथिल करत छोटे उद्योगधंदे सुरू करण्याची परवानगी दिल्याने हा काजू कारखाना मालाला कोणतीही मागणी नसताना केवळ आपले मजूर रिकामी राहू नयेत म्हणून धीम्या गतीने काम सुरू केलेले आहे. मात्र यावेळी ही कोरोनासाठी घ्यावयाच्या काळजी आणि दक्षताकामी कोणतीही तडजोड त्यांनी केलेली नाही. मजुरांच्या आरोग्य तपासणी साठी थर्मल गन सुद्धा याठिकाणी उपलब्ध करून घेतली आहे. त्यांच्याकडे कार्यरत असणाऱ्या सर्व मजुरांच्या काजू बी सुद्धा मार्केट रेट पेक्षा चड्या दराने खरेदी करून आपल्या मजुरांना दिलासा दिला आहे. त्यामुळे जयराज कॅश्यू इंडस्ट्रीजमध्ये काम करणाऱ्या मजुरांनी समाधान व्यक्त केलं आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.